Ukraine Russia War : युक्रेनचा मोठा ऑईल डेपो उद्ध्वस्त

ओडेसा ः युक्रेनमधील ओडेसा प्रांतात रशियाने रविवारी तुफान बॉम्बफेक केली. त्यामुळे येथे धूर आणि आगीचे साम्राज्य पसरले होते. दुसर्‍या छायाचित्रात  धूर आणि आगीतून स्वतःचा बचाव करत निघालेली स्थानिक महिला.
ओडेसा ः युक्रेनमधील ओडेसा प्रांतात रशियाने रविवारी तुफान बॉम्बफेक केली. त्यामुळे येथे धूर आणि आगीचे साम्राज्य पसरले होते. दुसर्‍या छायाचित्रात धूर आणि आगीतून स्वतःचा बचाव करत निघालेली स्थानिक महिला.
Published on
Updated on

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशियन फौजेने रविवारी पहाटे युक्रेनमधील ओडेसा प्रांतात मोठा हल्ला चढवत बॉम्बफेक केली. रशियाच्या (Ukraine Russia War) क्षेपणास्त्र हल्ल्यात येथे असलेला युक्रेनचा सर्वात मोठा तेल प्रक्रिया प्रकल्प उद्ध्वस्त झाला आहे, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्‍ता मेजर जनरल इगॉर कोनशेन्कोव्ह यांनी दिली.

या तेल प्रकल्पातून युक्रेनच्या मायकोलेव्ह येथील सैनिकांना इंधन पुरवठा केला जात होता. याशिवाय युक्रेनच्या कोस्टीयटीनिव्हका आणि ख्रेसिशचे येथील दारूगोळाही रशियाने नष्ट केला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या (Ukraine Russia War) 39 व्या दिवशी रशिया युक्रेनची राजधानी कीव्हच्या आसपासचा परिसर मुक्‍त करत आहे. या ठिकाणचा माहौल भयानक असून राजधानीपासून जवळच एका गावात 20 मृतदेह आढळून आले. या मृतदेहांचे हात बांधलेले असून त्यांना डोक्यात गोळी घातली असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी यावरून रशियावर टीका करताना रशिया इसिसपेक्षाही वाईट असल्याचे म्हटले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की केवळ दोन तास झोपतात!

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की हे रात्री केवळ दोन तास झोप घेत आहेत. झेलेन्स्की हे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या निशाण्यावर असल्याने जीवाच्या धोक्याने तीन ते चार दिवसांतून एकदा ते बंकरबाहेर येत असल्याची माहिती आहे. युद्धाला सुरुवात झाल्यापासून ते बंकरमध्येच राहत आहेत. झेलेन्स्कींचे कुटुंबीय त्यांच्यापासून दूरवर एका बंकरमध्येच असल्याची माहिती आहे.

दरम्यान, झेलेन्स्की यांची पत्नी आणि युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलोन झेलेन्स्की या दररोज प्रार्थना करत आहेत. नुकतेच त्यांनी जगभरातील महिलांना पाठिंब्याचे आवाहन केले होते. त्या सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सामूहिक कबरी आणि उद्ध्वस्त युक्रेनचे फोटो त्या शेअर करत असतात. नहसंहार रोखण्याचे आवाहनही करतात.

झेलेन्स्कींच्या बंकरला धातूचे दरवाजे

एका माहितीनुसार रशियन सैन्याने युक्रेनमध्ये धुमाकूळ घातला असून गेल्या महिन्यापासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की दर तीन ते चार दिवसांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बंकरबाहेर येतात. झेलेन्स्की राहत असलेल्या बंकरला धातूचे दरवाजे आहेत. या बंकरभोवती स्नायपर्सचा पहारा असतो. हे बंकर वायू सुरक्षा प्रणालीनेही सुसज्ज आहेत.

आतापर्यंत 12 हून अधिक वेळा झेलेन्स्कींच्या हत्येचा प्रयत्न झाल्याने ओलेना यांना चिंता वाटते. त्यामुळेच पतीसाठी त्या प्रार्थना करत असतात. दररोज पतीला फोन करण्याआधी मी प्रार्थना करते की, 'सर्व काही ठीक होऊ दे! माझे पती ठाम आणि सहनशील आहेत. देवाने त्यांना देशवासीयांच्या हितासाठी लढताना जिंकण्याची हिंमत द्यावी.' – ओलेना झेलेन्स्की, युक्रेनच्या फर्स्ट लेडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news