युक्रेनच्या इमारतींवर संशयास्पद खुणा? | पुढारी

युक्रेनच्या इमारतींवर संशयास्पद खुणा?

कीव्ह ः पुढारी वृत्‍तसेवा : रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात सहा दिवसांनंतर एक वेगळीच रणनीती पाहायला मिळाली आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह येथील इमारतींच्या टेरेसवर संशयास्पद खुणा, संकेत आढळून आले आहेत.

युक्रेनच्या अधिकार्‍यांच्या मते या खुणांद्वारे रशियाला हल्ल्यासाठी लक्ष्य सुचविले गेलेले असू शकते. या खुणा पाहून रशियाला हल्ला करावयाचे ठिकाण नेमकेपणाने कळू शकते. एकप्रकारे हल्ल्यासाठी रशियाला संकेत देण्याचा हा प्रकार असावा, असे युक्रेनच्या अधिकार्‍यांना वाटते.  त्यामुळेच इमारतींवरील या खुणा झाकण्याचे आदेश दिले गेले आहेत.

शहरातील उंच उमारती आणि गॅस पाईप्सवर अशी चिन्हे रेखाटली गेली आहेत. चकाकणारा लाल रंग या चिन्हांसाठी वापरला आहे. तसेच यात बाणाचे चिन्हही आहे. अधिकार्‍यांनी फेसबूक पोस्टद्वारे नागरिकांना असे संकेत तपासून ते नष्ट करावेत किंवा ते झाकावेत.

त्यावर रंग मारावा किंवा पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे. काही संशयास्पद लोकांचे हे काम असू शकते. हवाई हल्ल्यासाठी रशियाला काही संकेत देण्याचा प्रयत्न यातून केल्याचा दाट संशय आहे. शहरातील अनेक भागात रिफ्लेक्टिव्ह मार्किंगही आढळले आहे.

 

Back to top button