सर्वांत विनाशकारी आग! लॉस एंजेलिसमध्ये १० मृत्यू, १० हजार घरे जळाली, १५० अब्ज डॉलर्सचे नुकसान

Los Angeles wildfires | अद्याप पाच ठिकाणी आगीची धगधग कायम
Los Angeles wildfires
लॉस एंजेलिसमधील आग विझवण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरु आहे.(Image source- L.A. County Fire Department)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील जंगलातील भीषण आगीत आतापर्यंत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. लॉस एंजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनर विभागाने सांगितले की, त्यांना गुरुवारी संध्याकाळपर्यंत आगीशी संबंधित घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पण अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. दरम्यान, जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी भडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. येथील सहा जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. अद्याप येथील पाच ठिकाणी आग धगधगत आहे. आगीने जळून खाक झालेल्या घरांमध्ये हॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरांचाही समावेश आहे.

लॉस एंजेलिस काउंटीला लागलेली आगीची घटना आतापर्यंतची ही सर्वात विनाशकारी मानली जात आहे. या आगीत पॅलिसेड्स आणि ईटॉन परिसरातील सुमारे १० हजार घरे जळून खाक झाली आहेत.

पॅलिसेड्समध्ये आगीची तीव्रता अधिक, २० हजार एकर क्षेत्राला वेढा

लॉस एंजेलिसमधील पॅलिसेड्स, ईटन, हर्स्ट, लिडिया आणि केनेथ या भागात आगीने मोठे नुकसान झाले आहे. पॅलिसेड्समध्ये आगीची सुरुवात कशी झाली? याचा तपास केला जात आहे. या आगीत ५,३०० हून अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत. ईटनमधील आगीत ४ हजार ते ५ हजार इमारती जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. पॅलिसेड्समध्ये आगीची तीव्रता अधिक आहे. पॅसिफिक पॅलिसेड्समधील सुमारे २० हजार एकर क्षेत्र आगीने वेढले आहे. आतापर्यंत केवळ ६ टक्के आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. येथे अग्निशमन दलाकडून आग नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. येथील परिस्थितीचे सॅटेलाईट फोटो समोर आले असून त्यात आग आणि धुराचे लोट दिसत आहेत.

Los Angeles wildfires : १५० अब्ज डॉलर्स नुकसान

बीबीसीच्या वृत्तानुसार, या वणव्यांमुळे झालेल्या नुकसानीचा आकडा समोर आला आहे. अमेरिकेतील हवामान अंदाज सेवा देणारी खासगी कंपनी Accuweather च्या प्राथमिक अंदाजानुसार, आगीमुळे झालेले नुकसान १५० अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकतो. "हा वेगाने पसरत असलेला वणवा आधुनिक अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक नुकसान करणाऱ्या वणव्याच्या आपत्तींपैकी एक आहे," असे अ‍ॅक्यूवेदरचे मुख्य हवामानशास्त्रज्ञ जोनाथन पोर्टर यांनी म्हटले आहे.

Los Angeles wildfires
लॉस एंजेलिसमध्ये भीषण आग अन्‌ नोरा फतेही हॉटेलमध्ये अडकली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news