पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 13 : Indigo Flight : कोलकाता येथून दिल्लीला येत असलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाचा मागचा भाग दिल्ली विमानतळावर जमिनीवर आदळला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी झालेल्या या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. या विमानाला उड्डाण करण्यास आता हवाई वाहतूक महासंचलनालयाने (डीजीसीए) मनाई केली आहे.