वेध शेअर बाजाराचा : तेजीची मुसंडी निफ्टीचा नवा उच्चांक

वेध शेअर बाजाराचा : तेजीची मुसंडी निफ्टीचा नवा उच्चांक
Published on
Updated on

2023-24 च्या दुसर्‍या तिमाहीमध्ये भारताचा GDP रेशो 7.6 टक्क्यांनी वाढला. बाजारतज्ज्ञांनी 6.7 टक्क्यांचा अंदाज वर्तवला होता.

नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण दहा आयपीओंचे लिस्टींग झाले. त्यापैकी आठ आयपीओंनी प्रीमियमसहीत बाजारात प्रवेश केला. Protean e gov technologies ने इश्यू प्राईस एवढ्याच किमतीने, तर Fedbank Financial Services ने केवळ 1.4 टक्के Discount Price ने बाजारात प्रवेश केला. अमेरिकेतील महागाईने दिलासा दिल्यामुळे फेड रिझर्व्हकडून व्याज दर कमी करण्याबाबत दुरान्वयाने संकेत मिळू लागले आहेत. शिवाय बाँड यील्डसही कमी होत आहेत.

FPIS नी (Foreign Porlfolio Investment) सप्टेंबर 2023 मध्ये 14767 कोटी रुपयांची, तर ऑक्टोबर 2023 मध्ये 24548 कोटी रुपयांची विक्री केली होती; मात्र नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांनी 9001 कोटी रुपयांची खरेदी केली. वरील सर्व सकारात्मक, उत्साहवर्धक बातम्यांचा व्हायचा तोच परिणाम झाला. नोव्हेेंबर महिन्यात निफ्टी 50 सुमारे सहा टक्क्यांनी, सेन्सेक्स सव्वापाच टक्क्यांनी, तर निफ्टी बँक 4 टक्क्यांहून अधिक वाढला. इतकेच नाही तर 15 सप्टेंबर 2023 रोजी निफ्टीने नोंदवलेला उच्चांक (20222.45) मोडून निफ्टीने शुक्रवारी 20286.30 हा नवीन उच्चांक प्रस्थापित केला. जुलै 2022 नंतर निफ्टीचा हा सर्वाधिक मासिक वाढीचा उच्चांक आहे. निफ्टी 50 च्या 50 पैकी 48 स्टॉकर्सनी नोव्हेंबरमध्ये पॉझिटिव्ह वाढ दर्शवली आहे. केवळ बजाज फायनान्स आणि एसबीआय हे दोनच शेअर्स निगेटिव्ह झोनमध्ये राहिले.

HPCL हा सुमारे 40 टक्के वाढ नोंदवून नोव्हेंबर महिन्यातील निफ्टीचा हिरो ठरला. (शुक्रवारचा भाव 347.40 रु.) शिवाय रु. 351 हा त्याने 52 Week High चा उच्चांकही नोंदवला. 50000 कोटी रु. भागभांडवलाचा टप्पा हा शेअर ओलांडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज HPCL चे भागभांडवल 49789 कोटी रु. आहे. Hero moto, BPCL, Eicher motors, NTPC  यांनीही भरघोस रिटर्न दिले.

मागील दिवाळी ते यंदाची दिवाळी या एक वर्षाच्या कालावधीमध्ये निफ्टी 50 या इंडेक्समधील 25 शेअर्सनी 100 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. 482 टक्के वाढ नोंदवून Jindal Saw हा शेअर प्रथम क्रमांकावर आहे. जिंदाल सॉच्या बरोबरीने खालील शेअर्सनी प्रथम पाच क्रमांक पटकावले आहेत.

Fertilizers & Chemicals

ravancore – 438 टक्के 

Syzlon Energy – 358 टक्के

Kaynes Technology – 318 टक्के

Apar Industries – 258 टक्के

शासनाच्या रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याच्या आणि अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्याच्या भूमिकेमुळे RVNL, IRCON, IRFC  हे शेअर्स 200 टक्के वाढले. एक लाख कोटी रु. भागभांडवलाचा टप्पा पार करणे हा कोणत्याही कंपनीसाठी मानाचे स्थान मिळविण्यासारखे असते. मागील दिवाळीपासूनच्या एक वर्षाच्या काळात नऊ कंपन्यांनी हा पराक्रम करून दाखवला आहे. त्यामध्ये Bharat Electronics, Varun Beverages, Inter Globe Aviation, Bank of Baroda, Hindustan Aeronautics, Cholamandalam Investments, Britannia, Industrial Bank  या कंपन्यांचा समावेश आहे.

KPI Green Energy (रु. 1263.25), Bhel (रु. 166), BPCl  (रु 434.45), Phillips Carban Black  (रु. 271.45), Bharti Airtel (रु. 1022.55), HAL  (रु. 2500) या शेअर्सनी 52 Week High चा उच्चांक नोंदवला. येणारा किमान सहा महिन्यांचा काळ मार्केटसाठी तेजीचाच ठरेल. मे 2024 च्या सुमारास लोकसभेच्या निवडणुका होतील. तोपर्यंत निफ्टी 21000 चा टप्पा गाठेल काय?

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल, फेड रिझर्व्हकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता, भू राजकीय अस्थिरता कमी होण्याची आशा आणि अपेक्षेपेक्षा अधिक चांगले येणारे macro numbers  हे फॅक्टर्स निफ्टीची ग्रोथ स्टोरी सुरूच ठेवतील. परंतु, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सनी गेले काही महिने बाजारात धमाल केलेली आहे. त्या मानाने लार्ज कॅप शेअर्सची व्हॅल्युएशन्स अजूनही comfort zone मध्ये आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी इथून पुढे लार्ज कॅप IT आणि Banking stocks कडे लक्ष द्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news