

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात काल (दि. १६ ऑक्टोबर) पासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून आजच्या दुसऱ्या दिवशी भारताचा सराव सामना आस्ट्रेलियाशी झाला. या सराव सामन्यात भारताने आस्ट्रेलियावर ६ धावांनी रोमांचक विजय मिळवला. अखरेच्या षटकांत मोहम्मद शमीने सामना फिरवला. मोहम्मद शमीची अखेरच्या षटकातील भेदक गोलंदाजी आणि विराट कोहलीच्या दमदार फिल्डिंगच्या जोरावर हा सामना भारताने जिंकला. शमीने एका षटकात ४ धावांच्या बदल्यात ३ विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादव ५० धावा आणि केएल राहुलच्या ५७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १८६ धावा केल्या होत्या. हे लक्ष्य पार करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २० षटकांत १८० ऑलआउट झाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने ५४ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकार ठोकत ७६ धावांची खेळी केली.
हे वाचलंत का?