अशक्‍य ते शक्‍य..! गलवान खोर्‍यात भारतीय जवानांनी लुटला क्रिकेटचा आनंद

अशक्‍य ते शक्‍य..! गलवान खोर्‍यात भारतीय जवानांनी लुटला क्रिकेटचा आनंद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गलवान खोरे ( Galwan valley ) हे नाव उच्‍चारलं तरी भारत आणि चीनमधील सुमारे अडीच वर्षांपूर्वीच्‍या रक्‍तरंजित संर्घषाचे स्‍मरण होते. जून २०२० मध्‍ये प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्‍या सैन्‍याबरोबर भारतीय जवानांची चकमक झाली होती. तेव्‍हापासून या परिसरात भारतीय सैन्‍यदलाने अधिक सतर्कता बाळगत आहे. तसेच प्रतिकुल हवामानातही जवानांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्‍यासाठी विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमाचा एक भाग म्‍हणून भारतीय जवानांनी गलवान खोर्‍यात क्रिकेट खेळण्‍याचा आनंद लुटला, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहेत.

जवानांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्‍यासाठी क्रीडा उपक्रमांचे आयोजन

२०२० मध्‍ये चीनच्‍या जवानांबरोबर झालेल्‍या चकमकीनंतर भारतीय सैन्‍यदल अधिक सतर्क झाले आहे. गलवान खोर्‍यातील गस्‍त वाढली आहे. नुकतेच या परिसरात हाफ मॅरेथॉन, आइस हॉकी आणि क्रिकेट सामन्‍यांचे आयोजन करण्‍यात आले. यामध्‍ये भारतीय लष्कराच्‍या जवान मोठ्या उत्‍साहाने सहभागी झाले.

'एएनआय'ने दिलेल्‍या माहितीनुसार, भारतीय जवान गलवान खोर्‍यात क्रिकेट खेळताना दिसले. भारतीय लष्‍कराचा हवाला देत याचे फोटो आणि व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत. अतिउंच भागात तैनात असणार्‍या लष्‍कराच्‍या तुकड्यांसाठी तीव्र हिवाळ्यात विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे प्रतिकुल हवामानातही जवानांचे मनोधैर्य टिकवून ठेवता येते, असे सूत्रांनी म्‍हटले आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये काही लष्करी जवान गलवान खोर्‍याच्या बर्फाच्छादित शिखरांमध्ये आणि खडकाळ भागात क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी खेळपट्टी आणि विकेटचीही व्यवस्था केली आहे. वेगवेगळ्या छायाचित्रांमध्ये जवान फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत.

भारतीय जवान क्रिकेट नेमकं कुठे खेळत आहेत हे लष्कराने स्‍पष्‍ट केलेले नाही. मात्र असे मानले जाते की, हा भाग पूर्व लडाखमधील असावा. हा परिसर गलवान खोर्‍याच्‍या जवळ आहे. येथे जून 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. यामध्‍ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. तसेच मोठ्या संख्येने चिनी सैनिकही मारले गेले होते; परंतु चीनने आपल्या बाजूने नेमके किती सैनिक मारले हे कधीही उघड केले नाही. प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेजवळील डीबीओ सेक्टरमध्ये झालेल्या आइस हॉकी सामन्यात भारतीय लष्कराच्या तुकड्याही सहभागी झाल्या होत्या, असेही सूत्रांनी म्‍हटले आहे.

Galwan valley : अशक्‍य ते शक्‍य करुन दाखवतो…

१४ कॉर्प्सने ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, "पटियाला ब्रिगेड त्रिशूल डिव्हिजनने शून्याखालील तापमान आणि अति उंचीवर उत्साह आणि शौर्याने क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. आपण अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news