IndvsNed T20WC : भारताचा नेदरलँड्सवर दणदणीत विजय, सेमीफायनलचा मार्ग सुकर

IND vs NED T20 : 'Team India' tops the points table
IND vs NED T20 : 'Team India' tops the points table
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय संघाने आज झालेल्या सामन्यात नेदरलँड्सवर 56 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताचा सेमीफायनलचा मार्ग सुकर झाला आहे. टीम इंडियाने दिलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ 20 षटकात 9 विकेट्स गमावून 123 धावा करू शकला. भारताकडून भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या तर मोहम्मद शमीला 1 बळी घेण्यात यश आले.

तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली (नाबाद 62) आणि सूर्यकुमारच्‍या (नाबाद 51) अर्धशतकी खेळीच्‍या जोरावर भारताने नेदरलँडसमोर 180 धावांचे आव्‍हान ठेवले आहे. नेदरलँड्सकडून फ्रेड क्लासेन आणि पॉल वॉन मेकर्न यांनी 1-1 विकेट घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांना डच गोलंदाजांसमोर फार काळ मोकळेपणाने खेळता आले नाही. पॉवर प्लेच्या 6 षटकांत भारताची धावसंख्या 1 बाद 38 होती. 10 षटकांनंतर भारतीय संघ 1 बाद 67 पर्यंतच पोहोचू शकला. तर 15 षटकांअखेर टीम इंडियाची धावसंख्या 2 बाद 114 होती. भारताने शेवटच्या पाच षटकात 65 धावा केल्या. यावेळी विराट-सुर्यकुमार यादव यांनी चौकार षटकारांची आतषबाजी केली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. उपकर्णधार केएल राहुल तिसऱ्या षटकात केवळ 9 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. सलग दुसऱ्या सामन्यात राहुलने निराशा केली. नेदरलँडच्या गोलंदाजांनी पहिल्या 6 षटकांत टीच्चून मारा केला. भारताने 9व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. 10 षटकापर्यंत टीम इंडियाची धावसंख्या 1 गडी गमावून 67 धावा होती. रोहित आणि कोहली यांच्यातील अर्धशतकी भागीदारीही याच काळात पूर्ण झाली. रोहित शर्मानेही वेग पकडत 35 चेंडूत 29 वे अर्धशतक झळकावले, मात्र तो 53 धावा करून क्लासेनचा बळी ठरला. यानंतर मैदानात उतरलेल्या सूर्यकुमारने कोहली सोबत 95 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक ठोकले. या खेळीच्या जोरावर त्याने टी 20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेलला मागे टाकले. तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. डावाच्या शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने षटकार ठोकला आणि 25 चेंडूत 51 धावा केल्या. कोहली 62 धावांवर नाबाद राहिला.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्‍टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.

नेदरलँड संघ : विक्रमजीत सिंह, मॅक्स ओडॉड, बास डी लीड, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ यष्‍टीरक्षक), टिम प्रिंगल, लोगान वैन बीक,शरीझ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news