India vs Sri Lanka, 3rd T20 : भारत वि. श्रीलंका मालिका कोणाची ठरणार आज

India vs Sri Lanka, 3rd T20 : भारत वि. श्रीलंका मालिका कोणाची ठरणार आज
Published on
Updated on

राजकोट; वृत्तसंस्था :  भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना (India vs Sri Lanka, 3rd T20) आज राजकोटच्या मैदानात रंगणार आहे. मुंबईत झालेला पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती, परंतु पुण्यातील सामना जिंकून श्रीलंकेने मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे शेवटचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यासाठी दोन्ही संघ जिवाची बाजी लावतील.

राजकोटची खेळपट्टी ही सपाट असल्याने फलंदाजीस पोषक मानली जाते. त्यामुळे भारताच्या टॉप ऑर्डरची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. पुण्यातील सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजी बदडून काढण्यात आली, शिवाय त्यांनी 7 नोबॉल टाकले आणि त्यावरील फ्री हिटच्या 22 धावा दिल्या. या समस्येवर टीम इंडियाला काहीतरी तोडगा काढावा लागणार आहे. (India vs Sri Lanka, 3rd T20)

आजचा सामना

स्थळ : राजकोट.
वेळ : सायं. 7 वाजता.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क, डीडी स्पोर्टस्वर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news