ODI World Cup 2023 : वर्ल्डकपचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

ODI World Cup 2023 : वर्ल्डकपचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. 'बीसीसीआय'ने वेळापत्रकाचा मसुदा 'आयसीसी'कडे सुपूर्द केला असून, सर्व सदस्य देशांनी त्यावर सहमती दर्शवल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबरला होणार, हेही स्पष्ट झाले आहे.

2015 आणि 2019 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक स्पर्धा सुरू होण्याच्या जवळपास एक वर्ष आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, यावेळी जगाचे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे.

मीडिया रिपोटर्सनुसार, स्पर्धेतील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाईल. या मैदानावर 19 नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. टीम इंडिया आपले 9 सामने 9 वेगवेगळ्या ठिकाणी खेळणार आहे. त्याचवेळी 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार आहे. हा सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्धचे सामने 5 ठिकाणी होणार आहेत.

15 आणि 16 नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होणार असून, त्यांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. यजमान भारताचे साखळी सामने कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि बंगळूरसह 9 शहरांमध्ये होतील. दुसरीकडे, पाकिस्तानचे साखळी सामने 5 शहरांमध्ये होणार आहेत. पाकिस्तानविरुद्ध 6 आणि 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये क्वालिफायर फेरीतून येणारे दोन संघ खेळतील. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (20 ऑक्टोबर), चेन्नईमध्ये अफगाणिस्तान (23 ऑक्टोबर), दक्षिण आफ्रिका (27 ऑक्टोबर), कोलकात्यात बांगला देश (31 ऑक्टोबर), बंगळूरमध्ये न्यूझीलंड (5 नोव्हेंबर) आणि कोलकात्यात इंग्लंड (12 नोव्हेंबर) खेळेल.

या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत असून, त्यापैकी आठ संघ निश्चित आहेत आणि दोन संघ पात्रता फेरीतून येतील.

भारताचे संभाव्य वेळापत्रक : (ODI World Cup 2023)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 8 ऑक्टोबर चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान : 11 ऑक्टोबर दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान : 15 ऑक्टोबर अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगला देश : 19 ऑक्टोबर पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड : 22 ऑक्टोबर धरमशाला
भारत विरुद्ध इंग्लंड : 29 ऑक्टोबर लखनौ
भारत विरुद्ध क्वालिफायर : 2 नोव्हेंबर मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 5 नोव्हेंबर कोलकाता
भारत विरुद्ध क्वालिफायर : 11 नोव्हेंबर बंगळूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news