Rahul-Athiya : पाकविरुद्ध शुन्यावर बाद झाल्यामुळे केएल राहुलचे लग्न मोडले? अथिया शेट्टी होतेय ट्रोल

Rahul-Athiya : पाकविरुद्ध शुन्यावर बाद झाल्यामुळे केएल राहुलचे लग्न मोडले? अथिया शेट्टी होतेय ट्रोल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमहर्षक सामना झाला. यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवून 10 महिन्यांनंतर पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. मात्र, या सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) भारतीय चाहत्यांचा अपेक्षाभंग केला. तो डावाच्या दुस-याच चेंडूवर क्लिन बोल्ड झाला. त्याने एकाही धावेचे योगदान दिले नाही. तो शून्यावर माघारी परतला. या त्याच्या खराब खेळीची चर्चा तो बास झाल्यापासून सोशल मीडियात सुरू झाली.

खरे तर पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रूपाने सुरुवातीचा धक्का बसला आणि तो खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. यानंतर त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. काही चाहते त्यांचे लग्न मोडल्याची चर्चा करत आहेत. केएल राहुल शून्यावर बाद झाल्यानंतर सुनील शेट्टी आणि अथिया शेट्टी यांचे मीम्स व्हायरल झाले आहेत.

ट्विटरवर पोस्ट करत एका यूजरने लिहिलंय की, केएल राहुल बाद झाल्यावर सुनील शेट्टी अथिया शेट्टीला फोन करून विचारतो की, 'बेटा तुला राहुलबद्दल खात्री आहे का?'


एका युजरने केएल राहुलच्या क्रिकेट करिअरची अथिया शेट्टीच्या अभिनय कारकिर्दीशी तुलना केली आहे. त्याने लिहिलंय की, 'राहुलचे क्रिकेट करिअर आता अथिया शेट्टीच्या अभिनय कारकिर्दीसारखे होत आहे.'


तर एका यूजरने वेलकम चित्रपटाचा फोटो शेअर करताना एक मीम बनवलंय आणि लिहिलंय की केएल राहुलची इनिंग पाहिल्यानंतर सुनील शेट्टी, अथिया शेट्टी आणि तिचे संपूर्ण कुटुंब…

काही काळापासून बॉलिवूड अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीचे नाव भारताचा क्रिकेटर केएल राहुलसोबत जोडले जात आहे. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. ही जोडी सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीच्या तडप चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये एकत्र दिसली होती. तर राहुलच्या शस्त्रक्रियेदरम्यान अथिया त्याच्यासोबत उपस्थित होती. अशा परिस्थितीत दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात 10 विकेट गमावून 147 धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रूपाने सुरुवातीचा धक्का बसला. मात्र यानंतर रोहित शर्मा (12), विराट कोहली (35) यांनी डाव सांभाळला. यानंतर अखेरीस रवींद्र जडेजा (35), सुर्यकुमार यादव (18) आणि हार्दिक पांड्या (33*) यांनी संघाला शानदार विजय मिळवून दिला आणि पाच विकेट्स राखून सामना जिंकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news