काश्मीरबाबत भारताने एकतर्फी निर्णय घेऊ नये; चीनने काश्मीर वादात खुपसले नाक

काश्मीरबाबत भारताने एकतर्फी निर्णय घेऊ नये; चीनने काश्मीर वादात खुपसले नाक
Published on
Updated on

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : गोव्यातील एससीओ बैठकीनंतर चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग पाकिस्तानात दाखल झाले. इथे त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांची भेट घेतली. भारत-पाकने परस्पर चर्चेतून वाद मिटवावा, भारताने काश्मीरबाबत कोणताही एकतर्फी निर्णय घेऊ नये, अशी मुक्ताफळेही किन गँग यांनी उधळली.

संयुक्त राष्ट्राचे प्रस्ताव आणि द्विपक्षीय करारांच्या आधारे काश्मीरवर तोडगा काढायला हवा, असा आणखी एक सल्ला गँग यांनी दिला. पाकिस्ताननेही काश्मीरबाबत एकतर्फी निर्णय घेऊ नये, अशी मखलाशीही गँग यांनी केली. गँग यांचा हा पहिलाच पाक दौरा आहे.

बिलावल व गँग यांनी चीन-पाकिस्तानच्या सीपेक या संयुक्त प्रकल्पावरही चर्चा केली. संयुक्त पत्रकार परिषदेत, सीपेक हे पाकिस्तानच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले पाऊल असल्याचे बिलावल यांनी सांगितले. सीपेकला लवकरच 10 वर्षे पूर्ण होतील, असे बिलावल म्हणाले.

काय आहे सीपेक?

चीनच्या सहकार्याने 60 अब्ज डॉलर खर्चून उभारला जात असलेला चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच सीपेक होय.

भारताचा विरोध का?

पाकव्याप्त काश्मीरमधूनही सीपेक जात असल्याने भारताचा त्याला विरोध आहे. महत्त्वाचे म्हणजे सीपेकच्या माध्यमातून चीनला थेट अरबी समुद्रापर्यंत वाट मोकळी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news