India-Russia Summit : भारत-रशिया दरम्यान ‘टू प्लस टू’ चर्चा; आंतरराष्ट्रीय मुद्यांवर मंथन

India-Russia Summit : भारत-रशिया दरम्यान ‘टू प्लस टू’ चर्चा; आंतरराष्ट्रीय मुद्यांवर मंथन
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

जवळपास दोन वर्षांनंतर सोमवारी भारत-रशिया दरम्यान  द्विपक्षीय, क्षेत्रीत तसेच अफगानिस्तान सह विविध आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली. (India-Russia Summit) राजधानी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी त्यांचे समकक्ष रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सर्गेइ शोहगु तसेच परराष्ट्रीमंत्री सर्गी लेवरोव यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केली.

India-Russia Summit : एके-२०३ खरेदी संबंधी महत्वाचा करार

या दरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध संरक्षण करारांवर हस्ताक्षर करण्यात आले. बैठकीदरम्यान एके-२०३ खरेदी संबंधी महत्वाचा करार देखील करण्यात आला. या करारानंतर भारतीय संरक्षण दलाला आणखी बळकटी मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

उभय देशांदरम्यान संरक्षण सहकार्य भागीदारी एक महत्वाचा स्तंभ आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यासह एक स्थिरत्व प्रदान करण्याचे कार्य ही भागीदारी करेल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. भारत-रशिया संबंधांसाठी सध्यस्थितीत लष्कर आणि तांत्रित क्षेत्रात सहकार्य विशेष रूपाने महत्वाचे आहे. दोन्ही देश क्षेत्रीय सुरक्षेसह पुढे वाटचाल करतील, असा विश्वास रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सर्गेइ शोहगु यांनी व्यक्त केला. (India-Russia Summit)

बैठकी दरम्यान भारत-रशिया राईफल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ६ लाख १ हजार ४२७ (७.६३x३९ मिमी) असॉल्ट राइफल एके-२०३ च्याखरेदीसह २०२१-३१ लष्कर तांत्रिक सहकार्य कार्यक्रमासारख्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

गेल्या काळात भारताच्या उत्तरेकडील सीमेवर शेजारी राज्यांकडून करण्यात आलेल्या आगळीकीचा मुद्दा देखील बैठकीत उपस्थित करण्यात आले.

उत्तरी सीमेवर असाधारण लष्कराचे एकत्रितकरण तसेच विनाकारण आकळीकी देशासमक्ष प्रमुख आव्हाने असल्याचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

भारत आपल्या दृढ राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर आव्हानांचा सामना करण्यासाठी आश्वस्त आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महारोगराईसह शेजारी राष्ट्रांकडून असाधारण लष्कराचे एकत्रिकरण, दारूगोळाचा विस्तार तसेच २०२० च्या जून महिन्यात उत्तरी सीमेवर विनाकारण आक्रमकतासारखे आव्हाने उत्पन्न झाल्याचा मुद्दा 'टू प्लस टू' चर्चेदरम्यान संरक्षणमंत्र्यांनी उपस्थित केला.

दरम्यान सरंक्षण क्षेत्रातील सहकार्याबद्दल संरक्षणमंत्र्यांसोबत विस्तृत चर्चा झाल्याचे रशियाचे सर्गेइ शोइगु म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती पुतिन यांच्यादरम्यान विश्वासाचे नाते आहे.

दोन्ही देशांदरम्यान जी भागीदारी झाली आहे, ती बरीच विशेष आहे, अशी भावना परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी व्यक्त केली.

या शिखर संमेलनातुन महत्वपूर्ण परिणाम दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच द्विपक्षीय संबंध तसेच उभय देशांमध्ये सहकार्याच्या स्थितीवर समाधान व्यक्त केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news