

रायगड; सुयोग आंग्रे : महाराष्ट्रात अपारंपरिक क्षेत्रात नारळ लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी नारळ विकास मंडळाने पुढाकार घेतला आहे. कोकणात सुमारे 29 हजार 61 हेक्टर क्षेत्रावर नारळ लागवड झाली. उपलब्ध क्षेत्राच्या तुलनेत नारळ लागवड अत्यंत कमी आहे. नारळ उत्पादनात जगात भारत दुसरा आहे.
सद्यःस्थितीत 92 देशांत नारळाचे उत्पादन होते. आशिया खंडातील इंडोनेशिया, फिलिपिन्स, भारत आणि श्रीलंका हे देश उत्पादकतेत आघाडीवर आहेत.