

शेटफळगडे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीत गाडलेल्या चार मजुरांना शोधण्याचे काम आज शुक्रवारी सकाळी अंतिम टप्प्यात पोहचले असून ६६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहीरीतून एका मजुराला बाहेर काढण्यात एनडीएफआरच्या पथकाला यश आलं होत. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या मृतदेहापाठोपाठ तिसऱ्या मजूराचाही मृतदेह सापडला आहे. मनोज उर्फ लक्ष्मण सावंत असे या पहिल्या मृतदेह सापडलेल्या मजुराच नाव आहे. तर अन्य दोन मजुरांचे नाव अध्याप समजू शकलं नाही. आत्तापर्यंत तीन मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे मातीच्या ढिगा-याखाली विहिरीत गाडलेल्या चार मजूरांपैकी तीन मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. पहिला मृतदेह तब्बल ६५ तासांनी सापडला होता, त्यानंतर दीड तासाने दुसऱ्या दोन मजुरांचा मृतदेह सापडला आहे. जवळपास ६७ तासाने आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर आतापर्यंत तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढले असून आणखी एकला बाहेर काढण्याचे प्रयत्न 'एनडीएफआर'चे पथक करत आहे. शोध कार्य आज दुपारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत तीन मृतदेह सापडले असून मृतदेह घेऊन जाणारी शववाहिका नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी अडवली आहे, न्याय मिळेपर्यंत तसेच आणखी एकाला बाहेर काढल्याशिवाय रुग्णवाहिका जाऊ देणार नसल्याची नातेवाईकांची आणि गावकऱ्यांची आक्रमक भूमिका आहे.
हेही वाचा