

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली होती. या मालिकेतील दुसरा सामना आज (२४ जुलै) )पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल या मैदानावर खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारत हा सामना जिंकत मालिका आपल्या नावावर करण्यासाठी उत्सुक असेल.
भारतीय संघ – शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, आवेश खान
वेस्ट इंडिज संघ – शाय होप, ब्रेंडन किंग, शामराह ब्रुक्स, कायले मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), अल्झारी जोसेफ, अकिल हुसेन, रोवमन पॉवेल, रोमारिओ शेफर्ड, हायडेन वाल्श, जायडन सील्स