IND vs SL : भारताविरुद्धच्या T20 मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा!

Sri Lanka Cricket team
Sri Lanka Cricket team
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेने (IND vs SL) आपला संघ जाहीर केला आहे. दुखापतीमुळे अविष्का फर्नांडोसह तीन खेळाडूंना संघात स्थान मिळालेले नाही, अशा स्थितीत श्रीलंकेला टी-२० मालिकेपूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

(IND vs SL) टी-२० मालिकेसाठी श्रीलंका संघ पुढील प्रमाणे आहे :

दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निशान्का, कुशाल मेंडिस, चरिथ असालंका (उपकर्णधार), दिनेश चंडीमल, दानुष्का गुनाथिलका, कामिल मिसारा, जनिथ लियानेग, वानिंदु हसारंगा, चमाकि करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, लाहिरु कुमारा, बिनुरा फर्नांडो, शिरन फर्नांडो, महीश तिक्षाणा, जेफ्री वंडरसे, प्रवीण जयाविकरामा, आशियन डेनिएल. (IND vs SL)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी २० मालिकेत श्रीलंकेचे तीन खेळाडू जखमी झाले. त्यामुळे त्यांना भारत दौऱ्यातून बाहेर पडावे लागले आहे. यामध्ये अविष्का फर्नांडो, नुवान तुषारा आणि रमेश मेंडिस यांचा समावेश आहे.

श्रीलंका संघाचा भारत दौरा असा आहे…

२४ फेब्रुवारी पहिला T20 सामना : लखनऊ
२६ फेब्रुवारी दुसरा T20 सामना : धर्मशाला
२७ फेब्रुवारी तिसरा T20 सामना : धर्मशाला

४-८ मार्चदरम्यान पहिला कसोटी सामना : मोहाली
१२-१६ मार्चदरम्यान दूसरा टेस्ट : बंगळूर (डे-नाईट सामना)

श्रीलंकेपूर्वी भारतानेही संघ घोषित केला होता. भारताने ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, आवेश खान, रवी बिश्नोई आणि हर्षल पटेल यांच्यासह अनेक युवा खेळाडूंचाही संघात समावेश केला आहे.

श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियंक पंचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन (फिटनेसवर अवलंबून), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.

श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारताचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news