

पुढारी ऑनलाईन डेस्क : #INDvPAKT20 T20WorldCup : सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने भारतीय चाहत्यांना दिवाळी भेट दिली आहे. या सामन्यात त्याने 53 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी खेळली. 160 धावांचा पाठलाग करताना भारताला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. विराटने नो बॉलवर षटकार ठोकला. यानंतर तो फ्री हिटवर बोल्ड झाला, पण त्यावरही त्याने 3 धावा घेतल्या. त्यानंतर डीके बाहेर पडला. 2 चेंडूत 2 धावा हव्या होत्या. नवाजने वाईड टाकून अखेरच्या चेंडूवर अश्विनने विजय मिळवून दिला. विराट कोहलीने नाबाद 82 धावा केल्या.
टीम इंडियाने गेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला आहे. MCG स्टेडियमवर 1 लाख आणि जगभरातील टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुमारे 250 दशलक्ष प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारताने 4 गडी राखून पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवला.
टी 20 विश्वचषक 2021 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने 20 षटकांत 6 विकेट गमावून 160 धावा केल्या आणि सामना जिंकला. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये संघाने सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. राहुल आणि रोहित प्रत्येकी 4 धावा करून बाद झाले. कोहलीने शानदार अर्धशतकी भागीदारी केली. भारताने अखेरच्या षटकात 16 धावा वसूल करून सामना जिंकला.
तत्पूर्वी अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्य जोरावर भारताने रविवारी टी 20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला आठ बाद 159 धावांवर रोखले. अर्शदीपने चार षटकांत 32 धावा देत तीन बळी घेतले. त्याने पहिल्या दोन षटकांतच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (0) आणि मोहम्मद रिझवान (4) यांना बाद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पांड्याने 30 धावांत तीन बळी घेतले.
पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदने 51 धावा केल्या. तर, शान मसूदने संयमी खेळी करत 42 चेंडूत 52 धावा केल्या. फिरकीपटू आर अश्विन आणि अक्षर पटेल महागडे गोलंदाज ठरले. त्यामुळे सहावा गोलंदाज पांड्याने चार षटके टाकली.
गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे MCG खेळपट्टी झाकली गेली होती आणि ती अजूनही ओलसर होती. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची खूप मदत मिळाली. याचा पुरेपूर फायदा भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीपने घेतला. दोघांनी ताशी 130 किमी वेगाने गोलंदाजी केली.
पहिल्याच षटकात भुवनेश्वरने पाकिस्तानी फलंदाजांना जखडून ठेवले. दुसरीकडे अर्शदीपने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाबरला पायचीत पकडले. रिझवानही अर्शदीपच्या शॉर्ट बॉलवर चार धावा करत त्याचा बळी ठरला, त्याचा झेल भुवनेश्वरने फाइन लेग बाऊंड्रीजवळ पकडला.
टी 20 विश्वचषक स्पर्धेतीक सर्वात मोठा सामना म्हणजेच भारत-पाकिस्तान. हा सामना सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर सुरू आहे. भारताने टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिला फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य दिले आहे. विश्वचषकात खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
पहिला गोलंदाजी करण्याचा कर्णधार रोहितचा निर्णय योग्य भारतीय गोलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले. पहिला विश्वचषक खेळणाऱ्या अर्शदीपने सलामीवीर बाबर आणि रिझवानसह पाकिस्तानच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिक पांड्यानेही 3 बळी घेतले. पाकिस्तानकडून इफ्तिकार अहमदने 51 धावा केल्या. शान मसूदनेही 52 धावा केल्या. इफ्तिकारलाही नशिबाची साथ लाभली. त्याचा एक अवघड झेल शमीच्या चेंडूवर अश्विन थोडक्यात हुकवला. पाकिस्तानच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही.
भारताने चार विकेट गमावल्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या जोडीने संघाचा डाव सावरला. या जोडीने 40 चेंडूत 52 धावांची भागीदारी पूर्ण केली.
सात षटकांनंतर भारताने चार विकेट गमावून 33 धावा केल्या. हार्दिक पांड्या आणि विराट कोहली सध्या क्रीजवर आहेत. आतापर्यंत टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. राहुल चार धावा करून बाद झाला आणि रोहितने चार धावा केल्या. यानंतर सूर्यकुमार यादवही 15 धावा करून बाद झाला. सातव्या षटकात अक्षर दोन धावांवर धावबाद झाला.
चौथ्या षटकात 10 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा सात चेंडूत चार धावा करून बाद झाला. त्याला हरिस रौफने इफ्तिखार अहमद करवी स्लिपमध्ये झेलबाद केले. त्याआधी दुसऱ्या षटकात केएल राहुलला नसीम शाहने बोल्ड केले. राहुलला चार धावा करता आल्या. चार षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन बाद 17 होती.
भारतीय डावाच्या दुसऱ्याच षटकात संघाला पहिला धक्का बसला. केएल राहुल चार धावा करून बाद झाला. त्याला नसीम शाहने क्लिन बोल्ड केले. नसीमच्या चेंडूवर त्याने बचावात्मक स्ट्रोक मारला, पण चेंडू विकेटवर आदळला. दोन षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर सात धावा होती.
मसूदचे अर्धशतक
१८ षटकांमध्ये पाकिस्तानने सात गडी गमावत १३५ धावा केल्या. मसूदने आपले अर्धशतक ४० चेंडूत झळकावले. एकीकडे पाकिस्तानचे फलंदाज नांगी टाकत असताना मसूदने संयमित खेळीचे प्रदर्शन केले. १९ व्या षटकात आफ्रिदीने अर्शदीपला एक षटकार, एक चौकार लगावत पाकिस्तानचा धावफलक हालता ठेवला. पाकिस्तानने २० व्या षटकामध्ये १५० धावांचा टप्पा पार केला.
हार्दिक पंड्याने मोहम्मद नवाजला कार्तिककरवी झेलबाद केले. नवाज ६ चेंडूत ९ धावापर्यंतच मजल मारु शकला. यानंतर असिफ अली याला अर्शदीपने कार्तिककडे झेल देणे भाग पाडले. पाकिस्ताना सलग दोन धक्के बसले असून, १७ षटकांच्या खेळानंतर पाकिस्तानने ७ गडी गमावत १२६ धावा केल्या आहेत.
पाकिस्तानला लागोपाठ दोन षटकांत तीन धक्के बसले. 14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने शादाब खानला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. शादाबला सहा चेंडूंत पाच धावा करता आल्या. त्याचवेळी शेवटच्या चेंडूवर हार्दिकने हैदर अलीला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. त्याला दोन धावा करता आल्या. त्याआधी 13 व्या षटकात मोहम्मद शमीने इफ्तिखार अहमदला अल्बीडब्लू आऊट केले. त्याला 34 चेंडूत 51 धावा करता आल्या. इफ्तिखार आणि मसूद यांनी 50 चेंडूत 76 धावांची भागीदारी केली. 14 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 98 होती.
पाकिस्तानची तिसरी विकेट मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर इफ्तिकार अहमदच्या रूपाने पडली. इफ्तिकार 51 धावा करून बाद झाला, तत्पूर्वी त्याने पाकिस्तान सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवण्यासाठी चांगला प्रयत्न केला. इफ्तिकारने अर्धशतक झळकावले. त्याने अक्षर पटेलच्या षटकात 3 षटकार ठोकले आणि त्याने 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
10 षटकांनंतर पाकिस्तानने 2 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावा केल्या. सध्या शान मसूद 26 चेंडूत 29 धावांवर तर इफ्तिखार अहमद 21 चेंडूत 21 धावा करत फलंदाजी करत होते. दोघांमध्ये 40+ धावांची भागीदारी झाली.
आठ षटकांनंतर पाकिस्तानने दोन गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा केल्या. सध्या इफ्तिखार अहमद 14 चेंडूत 11 आणि शान मसूद 21 चेंडूत 25 धावा करत फलंदाजी करत होते. दोघांमध्ये 25+ धावांची भागीदारी झाली. आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शान मसूदचा रविचंद्रन अश्विनने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनच्या एक इंच पुढे चेंडू जमीनीवर आदळल्याचे व्हिडिओ रिप्लेमध्ये दिसले. त्यामुळे मसूद थोडक्यात बचावला.
पॉवरप्ले संपला. पहिल्या सहा षटकांत पाकिस्तानने दोन गडी गमावून 32 धावा केल्या. सध्या इफ्तिखार अहमद आणि शान मसूद क्रीजवर आहेत. यापूर्वी अर्शदीप सिंगने भारताला दोन यश मिळवून दिले. त्याने कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बाबरला खातेही उघडता आले नाही, तर रिझवानला केवळ चार धावा करता आल्या.
अर्शदीप सिंगने भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. डावाच्या चौथ्या षटकाच्याशेवटच्या चेंडूवर त्याने पाकिस्तानचा भरवश्याचा फलंदाज रिझवानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रिझवाने 12 चेंडूत 4 धावा केल्या. चार षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या दोन बाद 15 धावा होती.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पहिल्या दोन षटकात अगदी योग्य ठरला. भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात एक धाव दिली तर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने बाबर आझमला शुन्यावर पायचीत पकडून तंबूत पाठवले. या षटकात शेवटच्या चेंडूवर एक चौकार मारण्यात रिझवानला यश आले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक अष्टपैलू, तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह या सामन्यात उतरल्याचे भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, मी तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकी गोलंदाज आणि सहा फलंदाजांसह मैदानात उतरणार आहे.
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, हैदर अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
गेल्या टी 20 विश्वचषकातही भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता. त्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या टीम इंडियाने तो सामना 10 विकेटने गमावला होता. मात्र, त्या स्पर्धेनंतर भारतीय संघात बरेच बदल झाले असून गेल्या टी 20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मेलबर्नच्या मैदानात उतरणार आहे. (#INDvPAK T20WorldCup)
एमसीजी मैदानावरील मागील 5 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या पाच सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध केलेल्या 175 धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. पहिल्या डावात सरासरी 145 धावा तर दुसऱ्या डावाची सरासरी 140 धावा आहे. या मैदानावर एका डावात सर्वाधिक 184 धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. या मैदानावर पाकिस्तानची सरासरी 125 धावांची आहे. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी 59 बळी घेतले आहेत. (#INDvPAK T20WorldCup)
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन खेळण्यावर संशय आहे. त्याचवेळी फखर जमान पाकिस्तानसाठी या सामन्यातून बाहेर पडला आहे. दरम्यान, दोन्ही संघाची संभावित प्लेईंग इलेव्हन बाबत बरीच चर्चा सुरू आहे. (#INDvPAK T20WorldCup)