

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विट करून याची माहिती दिली आहे. हॅमिल्टनच्या सिडॉन पार्कवर हा सामना खेळवला जात होता. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिला फलंदाजी करताना भारताने 4.5 षटकांपर्यंत 22 धावा केल्या असताना पावसाला सुरुवात झाली. अखेर 3 तास 47 मिनिटांनंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा हा सामना 29-29 षटकांचा करण्यात आला व सामन्याला पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 8 षटकांचा खेळ झाला. तेव्हा पुन्हा पाऊस सुरू झाला. यानंतर सामना होऊ शकला नाही आणि तो रद्द करण्यात येत असल्याची घोषणा पंचांनी केली.
शुभमन गिल (42 चेंडूत 45) आणि सूर्यकुमार यादव (25 चेंडूत 34) नाबाद राहिले. कर्णधार शिखर धवन 10 चेंडूत तीन धावा करून बाद झाला. अशाप्रकारे तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसरा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबरला खेळवला जाईल.
सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. दोन्ही फलंदाज वेगाने धावा केल्या. गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. 12.5 षटकांनंतर भारताची धावसंख्या एक विकेट गमावून 89 होती. यावेळी सूर्या 34 आणि गिल 45 धावांवर खेळत होते.
सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल चांगली फलंदाजी करत आहेत. या दोन्ही फलंदाजांनी भारताची धावसंख्या 50 पार नेली. पावसामुळे हा सामना 29-29 षटकांचा खेळवला काणार आहे. भारताने 10 षटकात एक गडी गमावून 60 धावा केल्या. त्याचवेळी, 11 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 69 धावांवर पोहोचली. यावेळी सूर्यकुमार यादव 17 तर शुभमन गिल 42 धावांवर करत खेळत होते. दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली.
भारतीय कर्णधार शिखर धवन 10 चेंडूत तीन धावा करून बाद झाला. मॅट हेन्रीच्या चेंडूवर त्याला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद केले. पावसानंतर धवन झटपट धावा करण्याच्या इराद्याने क्रीझवर आला, पण त्याला यश आले नाही. गेल्या सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली, मात्र या सामन्यात त्याला काही विशेष करता आले नाही. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 25 होती.
भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. दरम्यान, पावसामुळे 4.5 षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला. सलामीवीर शिखर धवन 2, तर शुभमन गिल 19 धावा करून क्रीजवर होते. हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मैदान ओले असल्यामुळे नाणेफेक उशीर झाले. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यूझीलंडने टीम इंडियाचा 7 गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे शिखर धवनच्या संघाला मालिकेत टिकण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे.
पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघात 2 बदल करण्यात आले आहेत. दीपक चहर आणि दीपक हुडा यांचे पुनरागमन केले आहे. तर संजू सॅमसन आणि शार्दुल ठाकूर यांना बाहेर बसवण्यात आले आहे.
भारत प्लेइंग-11 : शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
न्यूझीलंड प्लेइंग-11 : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मिचेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन.