IND vs NED T20 : ‘टीम इंडिया’ पॉईंट टेबलमध्ये अव्वलस्थानी

IND vs NED T20 : 'Team India' tops the points table
IND vs NED T20 : 'Team India' tops the points table
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  टी 20 विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडचा ५६ धावांनी धुव्वा उडवला. विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना भारतीय संघाने रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत २ बाद १७९ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ २० षटकात ९ विकेट्स गमावू केवळ १२३ धावा करू शकला. (IND vs NED T20)

दरम्यान या विजयानंतर भारतीय संघ भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर-१२ च्या पॉईंटटेबलमध्ये अव्वलस्थानी पोहचला आहे. भारताने २ सामने जिंकत ४ गुण मिळवले आहेत. नेदरलँडविरूद्ध मोठा विजय मिळवल्याने भारताला रनरेटमध्येही चांगला फायदा झाला आहे. सध्या भारताचा नेट रनरेट + १.४२५ एवढा झाला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ अंक मिळवत दुसऱ्यास्थानी आहे. (IND vs NED T20)

रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम (IND vs NED T20)

रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाला पहिला धक्का लवकर बसला आणि उपकर्णधार केएल राहुल लवकर बाद झाला. मात्र यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी केली. रोहितही एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. त्याचे सिक्सर किंग युवराज सिंगला मागे टाकले.  (IND vs NED T20)

आयसीसी टी20 (ICC T20) वर्ल्ड कपच्या इतिहासात ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे ज्याने 50 हून अधिक षटकार ठोकले आहेत. या यादीत 63 षटकारांसह गेल अव्वल असून आता रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. रोहित शर्माने नेदरलँडविरुद्ध तिसरा षटकार मारताच त्याने युवराज सिंगला मागे टाकले. रोहितने 39 चेंडूत 53 धावांची खेळी केली. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार फटकावले.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news