IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तळपण्यास पाच सितारे सज्ज

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तळपण्यास पाच सितारे सज्ज
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचे पुढील मिशन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 आहे. ही मालिका निश्चित करेल की भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार की नाही. ही मालिका जशी संघासाठी महत्त्वाची आहे, तशी काही खेळाडूंचीही परीक्षा घेणारी असणार आहे. नागपूर कसोटीच्या (IND vs AUS Test) आधी अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात जे गेमचेंजर ठरू शकतील.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे होणार्‍या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा हुकमी एक्का असेल तो उमेश यादव होय. उमेशला नागपूरचा राजकुमार असेही म्हणतात, हे त्याचे घरचे मैदान आहे. पहिल्या कसोटीत तो भारतीय संघाचे मोठे शस्त्र ठरू शकतो. पाटा पिचवर विकेट घेण्यात त्याचा कोणी हात धरू शकत नाही. उमेशच्या अनुभवाचा भारतीय संघाला मोठा फायदा होईल.

पहिल्या कसोटीच्या आधी भारतीय संघातील सलामीवीर शुभमन गिल धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. वन-डेत शतक आणि द्विशतकानंतर टी-20 मध्ये त्याने विक्रमी शतकी खेळी केली. गेल्या सहा महिन्यांत त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक झळकावले आहे. नागपूर पिचवर त्याचा हा फॉर्म कायम राहिला तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना फक्त प्रेक्षकांची भूमिका पार पाडावी लागेल.

भारतीय संघातील सर्वात मोठा कसोटी स्टार ऋषभ पंत अपघातामुळे टीममध्ये नाही. त्याच्या गैरहजेरीत संजू सॅमसन देखील दुखापतीमुळे बाहेर आहे. टीममध्ये ईशान किशन आणि के.एस. भरत हे पर्याय आहेत. अंतिम 11 मध्ये संधी मिळण्याची सर्वाधिक शक्यता भरतची आहे. तो भारताच्या मर्यादित षटकांच्या सामन्याचाही भाग होता; परंतु त्याला संधी मिळाली नाही. या दरम्यान तो लाल चेंडूवर यष्टिरक्षणाचा सराव करताना दिसत होता, त्यामुळे त्याचे संघातील स्थान नक्की असल्याचे बोलले जाते. जर भरतची बॅट चालली तर पहिल्या कसोटीत उंचच्या उंच षटकार पाहायला मिळतील. (IND vs AUS Test)

आशिया कपमध्ये दुखापत झाल्यानंतर रवींद्र जडेजा मैदानावर दिसला नाही. जडेजाने रणजी ट्रॉफीत शानदार कामगिरी करत कमबॅकचे संकेत दिले. तो फक्त मोठे शॉटस् खेळत नाही तर चेंडूद्वारे ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. संघात निवडताना त्याला फिटनेसची अट घालण्यात आली होती; परंतु त्याने रणजी खेळून मॅच फिटनेसही दाखवला आणि यो-यो टेस्ट पास होऊन फिजिकल फिटनेसही सिद्ध केला. त्याच्यामुळे संघाला चांगला बॅलन्स मिळू शकतो.

बांगला देशविरुद्ध धारधार गोलंदाजी करणार्‍या कुलदीप यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत कमाल करून दाखवली होती. संघात आर. अश्विन आणि जडेजा असल्यामुळे यादवला अंतिम 11 मध्ये स्थान मिळणे अवघड दिसते, पण जर तो मैदानावर उतरला तर ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news