Ind Vs Aus T20 : तीन टी-20 सामन्यांची मालिका आजपासून, बुमराह, हर्षलकडे लक्ष

Ind Vs Aus T20 : तीन टी-20 सामन्यांची मालिका आजपासून, बुमराह, हर्षलकडे लक्ष
Published on
Updated on

मोहाली, वृत्तसंस्था : टी-20 विश्वचषक स्पर्धेला अवघा महिना उरला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जोरात तयारीला लागला असून त्याचाच एक भाग म्हणून जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध (Ind Vs Aus T20) तीन टी-20 सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. यातील पहिला सामना मोहाली (चंदीगड) येथे होत आहे. या मालिकेतून भारत आपले अंतिम संघ संयोजन शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताचे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे दुखापतीतून सावरून संघात परतले आहेत. त्यांचा मॅच फिटनेस या मालिकेतून समजून येणार आहे.

भारताला ही मालिका मायदेशात खेळायची असल्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी आव्हान नक्कीच सोपे नसेल. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांतील मागील आकडेवारी पाहता भारताचे पारडे जरा मजबूत आहे. या मालिकेतील प्रदर्शनानंतर संघ व्यवस्थापनाला त्यांच्यातील कमी समजू शकेल.

टी-20 क्रिकेटमध्ये या दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास असे लक्षात येते की, मागचे तीन सामने वगळता भारत हा नेहमीच वरचढ राहिलेला दिसतो. याचे कारण, मागच्या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला त्यांच्याच मायदेशात पराभवाची धूळ चारली आहे, जी भारतीय संघासाठी चिंतेची बाब असेल. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 23 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 13 सामन्यांमध्ये भारत, तर 9 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ जिंकला होता. राहिलेल्या एका सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता. या सामन्यांपैकी 7 सामने भारतात खेळले गेले. मायदेशात भारतीय संघाने 4 विजय मिळवले, तर तीन सामन्यांमध्ये पाहुण्या ऑस्ट्रेलियाने त्यांना मात दिली.

संघ यातून निवडणार (Ind Vs Aus T20)

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), एश्टन अ‍ॅगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक) , कॅमेरून ग्रीन, अ‍ॅडम झम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, सिन एबॉट.

पहिला टी-20

स्थळ : पीसीए ग्राऊंड, मोहाली.
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस् नेटवर्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news