Income tax return : प्राप्तिकराचा रिफंड मिळाला नसेल तर…

Published on
Updated on

प्राप्तिकर विवरणपत्र (Income tax return) भरण्याच्या शेवटच्या तारखेला आता दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. साधारणपणे पंधरा दिवसात रिफंडची रक्कम खात्यात जमा होतो. अशा स्थितीत तर आपल्याला आतापर्यंत रिफंड मिळालेला नसेल, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. रिफंड न मिळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. रिटर्न भरताना खात्याचा क्रमांक जर चुकला असेल किंवा अन्य चुकीची माहिती भरली असेल, तर रिफंडला विलंब होऊ शकतो. म्हणून यासाठी आपण रिफंडसाठी पुन्हा एकदा प्राप्तिकर खात्याला ऑनलाईन अर्ज देऊ शकतो.

अर्ज कसा करावा? : प्रारंभी प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जावे. तेथे माय अकाऊंटवर क्लिक करा. तेथे सर्व्हिस रिक्वेस्टच्या लिंकवर जा. त्यानंतर रिक्वेस्ट टाइप करून क्लिक करून न्यू रिक्वेस्टला निवडा. यानंतर तक्रारीच्या श्रेणीत रिफंड पुन्हा देण्याबाबतच्या टॅबला निवडा. या ठिकाणी रिटर्नविषयीची माहिती आणि रिफंड फेल होण्याच्या कारणाचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर सबमिटचे बटण दाबावे.

कारणे जाणून घ्या : रिफंड न मिळाल्यास त्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळाला लॉग इन करा. तेथे माय अकाऊंटवर रिफंड आणि डिमांड स्टेटसला क्लिक करा. संबंधित आर्थिक वर्ष नमूद करा. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला रिफंडविषयी विवरण समोर येईल. याबरोबरच प्राप्तिकर विभागाकडून रिफंड न पाठविण्यामागचे कारण समजू शकेल.

प्राप्तिकर विभागाकडून रिफंडची सूचना : रिटर्नची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्राप्तिकर विभाग रिफंड देण्याचे निश्चित करतो. यासंबंधी एसएमएस आणि ई-मलवरून माहिती दिली जाते. आपल्या खात्यावर किती रिफंड जमा होणार आहे, यासंदर्भात माहिती असते. अर्थात रिफंडची कल्पना आपल्याला आयटीआर भरतानाच येते. किंवा कर सल्लागारही उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या आधारावर रिफंडचा आकडा सांगतो. रिफंडच्या सूचनेत सिक्वेन्स नंबरही दिला जातो. अर्थात, नोंदणीकृत बँकेतच रिफंडची रक्कम जमा होते. ही प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असते. हा कालावधी आणखी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Income tax return)

खाते क्रमांक काळजीपूर्वक लिहा : रिफंडचा पैसा थेट बँकेत जमा होण्यासाठी त्याचे विवरण काळजीपूर्वक भरा. रिटर्न आणि बँक खाते हे अगोदरपासूनच जोडलेले असते. जर आपल्याकडे खाते जोडलेले नसेल तर त्यास नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. खाते जोडण्यासाठी ई-व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडा. (Income tax return)

इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (इव्हीसी) /आधार ओटीपी जनरेट करा आणि त्यानुसार खाते रिटर्नला जोडा. रिफंड री-इश्यू करण्याची विनंती सबमिट केल्यानंतर आयटी विभागाकडून एक संदेश मिळेल. याचाच अर्थ, आपला अर्ज यशस्वीरीत्या प्राप्त झाला असा होतो. त्यानुसार खात्यावर लवकरच रिफंड दिला जाईल, असे आयटी विभागाकडून सूचित केले जाते. रिफंडबाबत अडचणी दूर करता येत नसेल तर कर सल्लागाराची मदत घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news