‘नाशिककरांना लाभले सतरा एकरचे फुफ्फुस’ : देवेंद्र फडणवीस, विविध विकास कामांचे उद्घाटन

नाशिक : प्रभाग क्रमांक नऊमधील विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी ना. देवेंद्र फडणवीस. समवेत ना. डॉ. भारती पवार, आ. जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी.
नाशिक : प्रभाग क्रमांक नऊमधील विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी ना. देवेंद्र फडणवीस. समवेत ना. डॉ. भारती पवार, आ. जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्व. वसंत कानेटकर यांच्या नावाने 17 एकर जागेत सुरू झालेल्या उद्यानामुळे शहराला स्वच्छ प्राणवायू व फुफ्फुस मिळाले आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व राजमाता जिजाऊ महिला योगा हॉलमुळे नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक नऊमधील विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी ना. फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी मंत्री जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, नगरसेवक दिनकर पाटील, वर्षा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. ना. फडणवीस म्हणाले की, इतर ठिकाणी रिकामी जागा असली तर स्थानिक लोकप्रतिनिधी त्यावर खासगी बांधकामे करून पैसे कमवतात किंवा ती जागा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नगरसेवक दिनकर पाटील यांनी उद्यान उभारून शहराला स्वच्छ प्राणवायू उपलब्ध करून दिला आहे. शहरातील विकासकामे होत असल्याने नाशिक महानगरपालिकेत पुन्हा भाजपाची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या हस्ते ध—ुवनगर येथील पाच एकर जागेतील स्वा. विनायक दामोदर सावरकर रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. अमोल पाटील यांनी आभार मानले.

शहरात येत्या काही वर्षात निओ मेट्रो सरू होईल. त्याचप्रमाणे त्यास पूरक बसव्यवस्था सुरू आहे. एकात्मिक वाहतूक व्यवस्था सुरू झाल्यानंतर नाशिककरांना स्वत:चे वाहन वापरण्याची आवश्यकता राहणार नाही. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी कोणत्याही वेळी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध राहणार आहे.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

शहरातील सर्वांत मोठे उद्यान
शहरातील सर्वांत मोठे उद्यान म्हणून स्व. वसंत कानेटकर उद्यानाकडे पाहिले जात आहे. आकर्षक वृक्षसंपदा, रंगरगोटी, अ‍ॅम्पिथिएटर, हिरवळ, पक्ष्यांचा चिवचिवाट, निसर्गरम्य वातावरण, वन्यप्राण्यांचे शिल्प, लहान मुलांसाठी खेळण्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news