

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली जिल्ह्यात चार नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज मंगळवारी (दि. १५) रोजी पार पडल्या. या निवडणुकीत नगरपंचायतीवर प्रत्येकी एकाची काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि आदिवासी विद्यार्थी संघाने सत्ता प्रस्थापित केली.
कोरची नगर पंचायतीवर काँग्रेसने राष्ट्रवादी कॉग्रेस समर्थित अपक्ष उमेदवाराच्या सहकार्याने सत्ता मिळविली. येथे काँग्रेसच्या हर्षलता भैसारे नगराध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार हिरा राऊत उपाध्यक्ष म्हणून विजयी झाल्या. मुलचेरा नगरपंचायतीत शिवसेनेचे विकास नैताम नगराध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर वेलादी उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
सिरोंचा नगरपंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघाचे शेख फरजाना नगराध्यक्ष, तर शेख बबलू पाशा यांनी उपाध्यक्षपदी निवड झाली. तर भामरागड नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपच्या रामबाई महाका, तर उपाध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे विष्णू मडावी निवडून आले.
१४ फेब्रुवारीला ५, तर मंगळवारी १५ फेब्रुवारीला ४ नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक झाली. एकूण ९ नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ४ नगरपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली. शिवसेना आणि आदिवासी विद्यार्थी संघाने प्रत्येकी दोन, तर भाजपने एका नगर पंचायतींवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
हेही वाचलंत का?