file photo
Latest
आळंदी : पैशांचे अमिष दाखवत पुन्हा धर्मांतराचा प्रयत्न; मरकळमध्ये चौदा जणांवर गुन्हा दाखल
आळंदी (ता.खेड); पुढारी वृत्तसेवा : मरकळ येथे लोकांच्या घरासमोर जाऊन तुम्ही बायबल वाचता का, चर्चमध्ये या, आम्ही तुम्हाला धंद्याला आर्थिक मदत करू असे आमिष दाखवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा व धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच येशूचे रक्त म्हणून सरबत पाजून धर्मातराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असताना आता पुन्हा एकदा आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतर करत असल्याचा प्रकार रविवारी (दि.१५) मरकळ गावात घडला.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात प्रदीप मधुकर वाघमारे (च-होली), प्रशांत मधुकर वाघमारे (वय ३०), रोनक शैलेश शिंदे (वय १८ रा.भोसरी), अशोक मुकेश पांढरे (वय १९ भोसरी), मुकेश जयकुमार विश्वकर्मा (वय २५रा. भोसरी), लक्ष्मण श्रीरंग नायडू (वय ३५ रा. भोसरी), म्यूंगी व्युयुंग वुन (वय ३८रा. भोसरी), ज्यूईल वोमन युन (वय ३६ ), ईशा भाऊसाहेब साळवे (वय १९) तीन महिला आरोपी व एक अल्पवयीन मुलगी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून प्रसाद भाऊसाहेब साळुंखे (वय २५ रा. मरकळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

