मुलाला त्याच्या विकासासाठी आई-वडील दोघांचीही सोबत हवी, मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक मुलाला आई आणि वडिलांचा अर्थात दोघांच्याही प्रेमाची गरज असते, असे मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीच्या ताब्यात असणाऱ्या मुलाला त्याच्या वडिलांना भेटण्याची परवानगी दिली. यापूर्वी संबंधित खटल्यात कौटुंबिक न्यायालयाने मुलाच्या वडिलांना रात्रभर भेटण्याची परवानगी देण्यात आले होती. त्याविरोधात मुलाची आई न्यायमुर्ती मिलिंद जाधव यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेली होती.

यावर न्यायालयाने एका बाबीवर जोर म्हटलं की, "मुलांच्या आरोग्यात्मक विकासासाठी आई-वडिलांचे प्रेम, समजूत आणि सोबत गरजेची आहे. यामध्ये आई-वडील दोघांनीही आपली समान जबाबदारी विसरता कामा नये. दोघांनी सोबत असणे एक आदर्श असू शकतो. पण, काही कारणांनिमित्त दोघे वेगळे झालेले असतील. पण, मुलाच्या पालनपोषणाची आणि त्याच्या विकासाची प्राथमिक जबाबदारी दोघांनाही पूर्ण करावी लागेल. त्यामुळे प्रत्येक मुलाला आई आणि वडिलांच्या अर्थात दोघांच्याही प्रेमाची गरज असते. दोघा पती-पत्नीनी आपापसातील वाद मिटवून मुलाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे."

सविस्तर प्रकरण असे की, २०१२ मध्ये संबंधित जोडीने लग्न केले. २०१५ मध्ये त्यांना मुलगा झाला. परंतु, २०१६ मध्ये ते पती-पत्नी वेगळे झाले. महिलेने घटस्फोटाची तयारी केली आणि त्यामध्ये मुलाचा ताबा व त्याला सांभाळण्याची रक्कम याची कागदपत्रे होती. मात्र, या खटल्याला विलंब झाला. दरम्यान कौटुंबिक न्यायालयाने १७ ते ३० मे २०२२ या कालावधीत मुलाच्या वडिलास मुलाला रात्रभर भेटण्याची परवानगी दिली. या निर्णयाला मुलाच्या आईने उच्च न्यायालयात आव्हान दिले.

अखेर हे प्रकरण न्यायमुर्ती मिलिंद जाधव यांच्यापुढे आले. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतली. तसेच मुलासोबतचा वडिलांचा व्यवहार आणि आरोग्यावरून जाधव यांनी निष्कर्ष काढला की, मुलाचा वडिलांशी स्नेह जास्त आहे. न्यायमुर्ती जामदार यांनाही लक्षात आले की, वडिलांकडे मुलाचे प्रेम जास्त आहे. त्यानंतर कनिष्ठ स्तरावरील न्यायालयाचा आदेश आहे तसाच ठेवत मुलाच्या वडिलांना २४ मेपासून ५ जूनपर्यंत मुलासोबत राहण्याची परवानगी दिली. मात्र, मुलाला सुट्टीनिमित्त भारताच्या बाहेर घेऊन जाऊ नये, असाही आदेश दिला.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील माऊली रथ नेते गरजूंपर्यंत जेवण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news