IMD Predict Rainfall: होळीपूर्वी 10 राज्यांत पडणार पाऊस! IMD चा इशारा

Monsoon Forecast 2023
Monsoon Forecast 2023
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : होळीचा सण येऊन ठेपला आहे. अशातच देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा हवामान बदलणार आहे. आयएमडीने 10 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषत: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये वादळाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीर या डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. हवामान खात्यानुसार, दिल्ली आणि एनसीआरमध्येही हवामान बदलू शकते.
हवामान खात्याने राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वादळाचा इशारा जारी केला आहे. यासोबतच जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, सिक्कीम आणि मेघालयमध्ये काही प्रमाणात पाऊस सुरू राहू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस पडत आहे.

डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी

आयएमडीनुसार हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीरच्या उंच भागात हिमवर्षाव सुरू राहू शकतो. पुढील काही दिवस येथे तापमान वाढण्याची शक्यता कमी आहे.

दिल्ली, पंजाबसह अनेक राज्यांतील तापमान

दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये कमाल तापमान 28 ते 32 अंशांपर्यंत राहू शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

तापमान 5 अंशांपर्यंत वाढू शकते

दक्षिण राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंडमध्ये कमाल तापमानात 2 ते 5 अंशांनी वाढ होऊ शकते. येथील कमाल तापमान 32 ते 35 अंशांपर्यंत राहू शकते.

दिल्ली-एनसीआरमध्ये हवामान कसे असेल?

होळीचा सण एकदिवसावर आला आहे आणि दिल्ली-एनसीआरमध्ये हवामान बदलत आहे. आयएमडीनुसार, दिल्लीत अंशतः ढगाळ वातावरण असेल. येथे कमाल तापमान 28 ते 32 अंशांपर्यंत राहू शकते. तर किमान तापमान 15 अंशांपर्यंत राहील. पुढील दोन ते तीन दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news