नवी दिल्ली : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची कन्या सारा अली खान सध्या आपल्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील तिच्या छायाचित्रांमुळे जास्त चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी साराने आपला को-अॅक्टर विक्रांत मेस्सी याच्यासोबत मंदिरात पूजा करतानाचा फोटो शेअर केला होता. मात्र, तिने आता आपले बिकिनीतील फोटो शेअर करत सोशल मीडियावरचे तापमान वाढविले आहे.
साराने मल्टिकलर बिकिनीत समुद्र किनार्यावर मस्ती करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साराचा हा अनोखा लूक अत्यंत आकर्षक दिसत आहे. हे फोटो शेअर करताना साराने लिहिले आहे की, 'सूर्य, समुद्र आणि वाळू.' साराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. साराच्या वर्कफ्रंटचा विचार करावयाचा झाल्यास यापूर्वी ती अक्षय कुमार व धनुष्य यांच्यासोबत 'अतरंगी' मध्ये दिसली होती. नुकतेच तिच्या 'गॅसलाईट' नामक चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.