ICC World Cup : टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बाबत मोठी अपडेट, पंड्याची जागा घेणार ‘हा’ स्टार खेळाडू!

ICC World Cup : टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बाबत मोठी अपडेट, पंड्याची जागा घेणार ‘हा’ स्टार खेळाडू!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC World Cup : भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकातील सामना आज (दि.29) लखनौच्या एकना स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. दुखापतीने त्रस्त असलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या या सामन्यात सहभागी होणार नाहीय. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. अशा स्थितीत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने यावेळी हार्दिक पंड्याच्या जागी कोण येणार याबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्याने सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेत संघाची प्लेइंग 11 कशी असेल याबाबत खुलासा केला.

पंड्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळेल?

भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. सामन्याच्या एक दिवस आधी केएल राहुलने पत्रकार परिषदेत याला दुजोरा दिला. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते, असे संकेत राहुलने यावेळी दिले. राहुल म्हणाला की, हार्दिक हा संघाचा अत्यंत महत्त्वाचा सदस्य आहे. त्यामुळे त्याची उणीव संघाला जाणवत आहे. इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यासाठी पंड्या उपलब्ध नसल्याने सूर्यकुमारला संधी मिळू शकते. इंग्लंडला विश्वचषकात अपेक्षित निकाल मिळाले नसले तरी हा धोकादायक संघ आहेत. आम्ही कोणत्याही संघाला हलके घेत नाही.'

पहिल्या सामन्यात सूर्याकडून निराशा

टीम इंडियाने आपला शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला. त्या सामन्यात हार्दिक पंड्या प्लेइंग 11 चा भाग होऊ शकला नाही. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळाली, मात्र तो 2 धावा करून धावबाद झाला. विश्वचषकातील त्याचा हा पहिलाच सामना होता.

भारताची संभाव्य प्लेइंग-11 :

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

इंग्लंडची संभाव्य प्लेइंग-11 :

डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news