T20 ICC Rankings : भारताला झटका, विराट कोहली टॉप 10 मधून बाहेर

T20 ICC Rankings : भारताला झटका, विराट कोहली टॉप 10 मधून बाहेर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rankings : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल (T20 WC Semi Final) सामन्यापूर्वी आयसीसीकडून (ICC) मोठे बक्षीस मिळाले आहे. टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत तीन अर्धशतके झळकावणाऱ्या सूर्याने T20 क्रमवारीत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गुण मिळवले आहेत. या प्रकरणात त्याने इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सचा विक्रम मोडला आहे. (T20 ICC Rankings virat out of top 10)

सुर्याने मिळवले करिअरमधील सर्वोत्तम रेटिंग

टीम इंडियाच्या (Team India) या 32 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाचे आता 869 गुण झाले आहेत, जे त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम गुण ठरले आहे. त्याच वेळी, अॅलेक्स हेल्सचे सर्वोत्तम गुण 866 होते. सर्वकालीन उच्च गुणांचा जागतिक विक्रम अजूनही इंग्लंडच्या डेव्हिड मलानच्या नावावर आहे. त्याने 915 गुणांपर्यंत झेप घेतली होती. पण आगामी काळात सूर्या लवकरच मलानचा सुद्धा सर्वाधिक गुणांचा विक्रम मागे टाकेल अशी अशा सर्व क्रिकेट चाहत्यांना आहे. (T20 ICC Rankings virat out of top 10)

सूर्याने या वर्षी टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. असी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. ICC च्या टी 20 क्रमवारीत सूर्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानमध्ये 39 गुणांचे अंतर आहे. मात्र, नवीन आयसीसी क्रमवारीत पहिल्या 5 फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सूर्या आणि रिझवान यांच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा कॉनवे, पाकिस्तानचा बाबर आझम आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. (T20 ICC Rankings virat out of top 10)

आयसीसी क्रमवारीतील टॉप 10 फलंदाज :

सूर्यकुमार यादव : 869
मोहम्मद रिझवान : 830
डेव्हॉन कॉन्वे: 779
बाबर आझम : 762
एडन मार्कराम: 748
डेव्हिड मलान: 734
ग्लेन फिलिप्स: 697
रिले रुसो: 693
अॅरॉन फिंच: 680
पाठुम निसंका : 673

विराट टॉप 10 मधून बाहेर… (Virat Kohli)

टी 20 क्रमवारीत एका बाजूला भारताच्या सूर्याने टॉमची कामगिरी केली आहे. पण दुसरीकडे विराट कोहलीला (Virat Kohli) मोठा धक्का बसला आहे. तो आता पहिल्या 10 मधून बाहेर पडला आहे. विराट सध्या 11 व्या क्रमांकावर आहे. तर केएल राहुल एका स्थाना पुढे येत त्याने 16 वे स्थान मिळवले आहे तर रोहित शर्मा 18 व्या स्थानावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news