ICC WC BAN vs SL : श्रीलंकेचे बांगलादेशला 280 धावांचे लक्ष्य! चारिथ असलंकाचे झुंझार शतक

ICC WC BAN vs SL : श्रीलंकेचे बांगलादेशला 280 धावांचे लक्ष्य! चारिथ असलंकाचे झुंझार शतक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC WC BAN vs SL : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 38 व्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी गमावून 49.3 षटकांत 279 धावा केल्या. श्रीलंकेकडून चारिथ असलंकाने शानदार शतक (108) केले. त्याच्याशिवाय पथुम निसांका (41) आणि सदिरा समरविक्रमा (41) यांनीही उपयुक्त योगदान दिले. बांगलादेशकडून तनझिम हसन शाकिबने 3 बळी घेतले.

पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेने केल्या 52 धावा

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाला पहिल्याच षटकात कुसल परेराच्या (4) रूपाने मोठा धक्का बसला. तो शरीफुल इस्लामच्या चेंडूवर मुशफिकर रहीमने झेलबाद झाला. या खराब सुरुवातीतून मेंडीस आणि निसांकाने डाव सावरला आणि 10 षटकांनंतर 1 गडी गमावून 52 धावा केल्या. पण त्यानंतर श्रीलंकेला दुसरा धक्का 66 धावांवर बसला. मेंडीस (19) बास झाला. त्यानंतर लगेचच 72 धावांवर धोकादायक वाटणारा निसांकाही (41) माघारी परतला.

यानंतर सादिरा समरविक्रमा आणि असलंका यांनी लंकेच्या डावाला आकार देण्याचा अटोकाट प्रयत्न केला. दोघांनी 63 धावांची भागिदारी रचली. पण सदिरा 41 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सदिरा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या अँजेलो मॅथ्यूजही टाइम आउटचा बळी ठरला. त्याच्या विकेटवरून वाद झाला, टाईम आऊटमुळे त्याला एकही चेंडू न खेळता तंबूत परतावे लागले. अशाप्रकारे श्रीलंकेचा निम्मा संघ 135 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण मॅथ्यूजच्या वादग्रस्त विकेटने श्रीलंकेच्या खेळाडूंचा उत्साह वाढला आणि त्यांनी क्रिजवर जम बसवलेल्या असलंकाला भक्कम साथ दिली. महिष टीक्षाना 21 धावा करून बाद झाला. त्याची विकेट शरीफुल इस्लामने घेतली. नसूम अहमदने त्याचा झेल पकडला. शरीफुलची ही तिसरी विकेट ठरली. त्यानंतर धनंजय डी सिल्वाने 34 धावांचे योगदान दिले.

असलंकाचे शानदार शतक

असलंकाने चांगली फलंदाजी केली आणि त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे शतक 101 चेंडूत पूर्ण केले. विश्वचषकातील त्याचे हे पहिलेच शतक आहे. त्याने समरविक्रमासोबत 63 आणि धनंजय डी सिल्वासोबत 78 धावांची भागीदारी केली. त्याने 105 चेंडूत 108 धावांची शानदार खेळी केली, ज्यात 6 चौकार आणि 5 षटकारांचाही समावेश होता. दरम्यान, असलंकानेही त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 1,500 धावा पूर्ण केल्या.

अशी झाली बांगलादेशची गोलंदाजी

तस्किन अहमदने 10 षटकांत 3.9 षटकांच्या इकॉनॉमी रेटने 39 धावा दिल्या. किफायतशीर गोलंदाजी करूनही त्याला एकही विकेट घेता आली नाही. मेहदी हसन मिराजने 10 षटकात 49 धावा देत 1 यश मिळवले. कर्णधार शाकिबने 57 धावा देताना 2 बळी घेतले. तंजीम हसनने 10 षटकात 80 धावा देत 3 बळी घेतले.

दोन्ही संघांच्या प्लेईंग 11

श्रीलंका संघ : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महिष तिक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून राजिथा, दिलशान मदुशंका.

बांगलादेश संघ : तन्झीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराज, तन्झीम हसन शाकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news