Ab De Villiers: एबी डिव्हिलियर्सचे कोहलीबाबत धक्कादायक विधान, म्हणाला; ‘विराट गर्विष्ठ..’

Ab De Villiers: एबी डिव्हिलियर्सचे कोहलीबाबत धक्कादायक विधान, म्हणाला; ‘विराट गर्विष्ठ..’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेव्हा मी विराट कोहलीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो थोडा उद्धट आणि गर्विष्ठ होता, असे धक्कादायक विधान आरसीबीचा माजी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सने (Ab De Villiers) केले आहे. एका शोमध्ये ख्रिस गेलच्या (chris gayle) एका प्रश्नाला उत्तर देताना याचा खुलासा केला आहे.

विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) यांच्यातील मैत्री सगळ्यांनाच माहिती आहे. मैदानाबाहेरही दोन्ही दिग्गजांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे. पण या दोघांमध्ये इतकी घट्ट मैत्री कशी झाली हे जाणून घेण्यासारखी गोष्ट आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून ते एकत्र खेळले. दोघांनी अनेक संस्मरणीय भागीदारी रचल्या आहेत. पण आता डिव्हिलियर्सने कोहलीला पहिल्यांदा भेटल्यावर काय वाटले होते याचा खुलासा केला आहे.

आरसीबीच्या एका टॉक शो मध्ये ख्रिस गेलने (chris gayle) एबीडीची मुलाखत घेतली. त्यावेळी डिव्हिलियर्सला (Ab De Villiers) कोहलीसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना एबीडी म्हणाला की, 'हा प्रश्न मला याआधीही अनेकदा विचारण्यात आला आहे. पहिल्याच भेटीत मला विराट गर्विष्ठ आणि उद्धट वाटला. तो त्याच्या वेगळ्या हेअरस्टाइलने फुशारकी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते. त्या क्षणी, मला वाटले की त्याचे पाय जमीनीवर असणे आवश्यक आहे. पण पुढे अनेक सामन्यांमध्ये एकत्र खेळल्यानंतर आमच्या दोघांमध्ये एक चांगले बाँन्डींग निर्माण झाले. त्यानंतर माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. माझ्या मनात विराटबद्दलचा आदर वाढला. मी त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीकडून आनंदाने खेळलो.'

कोहली (Virat kohli) आणि डिव्हिलियर्स ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मजबूत फलंदाजी जोडी पैकी एक आहे. दोघांनी आयपीएल कारकिर्दीत पाच शतकी भागीदारी आणि दोन द्विशतकी भागीदारी रचल्या आहेत. लीगच्या इतिहासातील सर्वोच्च भागीदारीचा विक्रमही या जोडीच्या नावावर आहे. विराट-एबीडीने 2016 च्या आयपीएल स्पर्धेत गुजरात लायन्सविरुद्ध केवळ 97 चेंडूत दुसऱ्या विकेटसाठी 229 धावांची भागिदारी केली होती.

एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांना आरसीबीच्या 'हॉल ऑफ फेम' मध्ये सामील करण्यात आले. डिव्हिलियर्स 2011 मध्ये RCB मध्ये सामील झाला आणि 2021 मध्ये निवृत्तीपर्यंत फ्रँचायझीसाठी खेळत राहिला, तर गेल 2018 मध्ये पंजाब किंग्जमध्ये जाण्यापूर्वी 2011-2017 पर्यंत बंगळूरसाठी खेळला.

गेल हा आयपीएलमध्ये खेळलेला सर्वात महान फलंदाज आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, डिव्हिलियर्स लिगच्या इतिहासात सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 184 सामन्यांमध्ये 39.70 च्या सरासरीने आणि 151.68 च्या स्ट्राइक रेटने 5162 धावा फटकावल्या आहेत. असे असूनही तो आरसीबीला आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरला. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीनीची मोहिम 2 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर विराटचा संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध मैदानात उतरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news