

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ( Bihar CM Nitish Kumar ) यांनी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल आज (दि.८) माफी मागितली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी (दि.७) राज्य विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणात महिला शिक्षणावर भाष्य केले होते. ( Nitish Kumar apologise )
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी राज्य विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणात महिला शिक्षणावर वादग्रस्त भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, "मुलीचे लग्न झाले की, पुरुष रोज रात्री संबंध निर्माण करतात. यामुळे मूल जन्माला येते; परंतु, मुली साक्षर असतील तर प्रजनन दर घसरतो. मुलगी सुशिक्षित असेल तर प्रजनन दर सरासरी दोन टक्क्यांपर्यंत खाली येतो आणि जर तिने शालेय शिक्षण पूर्ण केले असेल तर प्रजनन दर राष्ट्रीय स्तरावर १.७ टक्क्यांपर्यंत खाली येतो."
नितीश कुमारांच्या वादग्रस्त विधानावर सभागृहातच महिला आमदारांनी संताप व्यक्त केला होता. तर काही आमदारांनी हसत होते. नितीश कुमारांच्या वादग्रस्त विधानावर विरोधी पक्षांमधील नेत्यांनी चौफेर टीका केली. यानंतर अखेर आज नितीश कुमारांनी माध्यमांशी बाेलताना आपल्या विधानावर माफी मागितले. मी माझे विधान मागे घेतो, असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
नितीश कुमार म्हणाले, मी विधानसभेत बोलताना महिलांच्या शिक्षणाचे फायदे सांगत होतो. मी सांगितले की, मुली शिक्षित झाल्या तर जन्मदर कसा कमी झाला. मी जे बोललो ते योग्यच होते; पण त्याचा निषेध होत असल्याने आणि लोकांना वाटते की मी काहीतरी चुकीचे बोलले आहे किंवा चुकीचे बोलले आहे, तर मी माफी मागतो. मी जे बोललो ते शब्द मी परत घेतो."
हेही वाचा :