MI vs SRH : हैदराबादचे मुंबईसमोर २०१ धावांचे आव्हान

MI vs SRH
MI vs SRH
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये २०२३ च्या हंगामातील आज ६९ वा सामना रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने मयांक अग्रवाल आणि विव्रांत शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर धावांचा डोंगर उभारला आहे. हैदराबादने २० षटकांअखेर ५ विकेट गमावत २०० धावा केल्या आणि मुंबईसमोर २०१ धावांचे आव्हान ठेवले आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी मुंबईला हा सामना चांगल्या धावगतीने जिंकावा लागणार आहे.

विव्रांत शर्मा आणि मयांक अग्रवालने पहिल्या विकेटसाठी १४० धावांची भागिदारी रचली. सनरायझर्स हैदराबादकडून विव्रांत शर्माने ४७ चेंडूमध्ये ६९ धावा, मयांक अग्रवाल ४६ चेंडूमध्ये ८३ धावा आणि हेनरिख क्लासीनने १३ चेंडूमध्ये १८ धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सकडून आकाश मधवालने ४ तर क्रिस जॉर्डनने १ विकेट पटकावली.
परतला.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news