

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादशी आज (दि.२) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याकडे राजस्थानचे लक्ष असेल, तर गेल्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करणाऱ्या हैदराबादकडे पुनरागमनाचे लक्ष असेल. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम क्षेत्ररक्षणाचा करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक आणि कर्णधार), रायन पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा
सनराइजर्स हैदराबाद : ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंह, हेनरिच क्लासेन (विकेटकीपर), नीतीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जेनसेन, पैट कमिंस (कप्तान), भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन