

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टेडियममधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांच्या इतका पसंतीस उतरत आहे की, त्यांनी या व्हिडिओतील व्यक्तीला 'हजबंड ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे ऐकूण तुम्हालाही असे या व्हिडिओमध्ये (Husband-Wife Video) काय खास आहे? असा प्रश्न पडला असेल.
व्हायरल (Husband-Wife Video) होत असलेल्या या व्हिडिओत पती-पत्नीसोबत स्टेडियममध्ये मॅच पाहताना दिसत आहे. पतीच्या एका छोट्याशा हावभावाने अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत नेटकऱ्यांकडून हा व्हिडिओ २२ हजारवेळा पाहण्यात आला आहे.
(Husband-Wife Video) या व्हायरल व्हिडिओमध्ये, पती-पत्नीसाठी फोनचा फ्रंट कॅमेरा स्थिर धरून ठेवला आहे, जेणेकरून ती तिचा मेकअप चांगल्या पद्धतीने करू शकेल. स्टेडियममधील पती-पत्नीच्या जोडीवर मॅच रेकॉर्ड करेपर्यंत कॅमेरामनची नजर होती. त्यानेच हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
यावर नेटकऱ्यांनी उत्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नेटकऱ्यांनी 'हजबंड ऑफ द इयर' असे लिहिले. काहींनी या व्हिडिओतील पत्नीवर टीका केली, तर काहींना पतीच्या हावभाव भावल्याचे म्हटलं आहे.
हेही वाचा :