Humanity in khaki : सावित्रीच्या लेकीसाठी खाकीतील माणूसकी सरसावली

Humanity in khaki : सावित्रीच्या लेकीसाठी खाकीतील माणूसकी सरसावली
Published on
Updated on

जळगाव : नरेंद्र पाटील
पूर्वीपेक्षा पोलीसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. वर्दीतही माणूसकी ओतप्रोत भरलेली असते. पोलीस हा मित्र असून वेळोवेळी संकटात मदतीचा हात पोलीस देत असतो. खाकीतील या माणूसकीचे दर्शन जळगाव येथील शनिपेठ पोलीस ठाण्यात झाले. अल्पवयीन शाळकरी मुलीचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सहा किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या सावित्रीच्या लेकीसाठी खाकीतील माणूसकी सरसावली आहे.

शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीत अचानक आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये अमोल रमेश जंगले (रा. माधवनगर, सुंदरनगर, जळगाव) यांची होंडा ड्रिम युगा मोटरसायकल (क्रमांक एम एच 19 बी झेड 3698) तसेच त्यांची मुलगी अक्षरा अमोल जंगले (वय १३ वर्षे) हिची सायकल पेट घेऊन जळाल्याने वाहन व सायकलचे मोठे नुकसान झाले होते.

या प्रकरणाची दखल घेऊन 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचे भान ठेवत पोलीस निरीक्षक धारबळे, पोलीस हेड कॉन्सटेबल रविंद्र परदेशी, विजय पाटील यांसह संदिप इंधाटे, प्रकाश वाघ, ज्ञानेश्वर गावंडे, भूषण पाटील, अविनाश पाटोल, बंटी राणे, गिरिष पाटील, सर्व उद्योजक, एमआयडीसी, जळगाव यांच्या सेवाभावी सहकार्याने अक्षरा अमोल जंगले हिला सोमवार (दि.११) रोजी एक नवीन सायकल भेट म्हणून दिली. त्यामुळे अक्षरा आता पुन्हा नव्या सायकलवर शिक्षणाचा प्रवास करीत शाळेचे धडे गिरवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news