

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका कंपनीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी नुकतेच एक भन्नाट डोके लावले. जगप्रसिद्ध बर्गर कंपनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ऋतिक रोशन हा अभिनेता या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. कंपनीने चालवलेले भन्नाट डोके पाहून इतर कोणतीही कंपनी या कल्पनेला दाद देईल. ऋतिकने यावर ट्विटरच्या माध्यमातून कमेंट देखील दिली आहे. फिल्म सिटीमध्ये फोटोग्राफर्सनी ऋतिकचे फोटो घेत असतानाही घटना घडली. यावेळी छायाचित्रकार ऋतिकचे फोटो घेत होते, याचदरम्यान बर्गरच्या कंपनीने फोटोग्राफीचा फायदा घेतला. (Hrithik Roshan Burger Ad)
आपल्या वॅनिटी वॅनमधून बाहेर येत असताना उपस्थित असणाऱ्या फोटोग्राफर्सनी ऋतिकचे फोटो घेण्यास सुरूवात केली. यावेळी त्यानेही पोज द्यायला सुरूवात केली. हे क्षण टिपण्यासाठी सर्व कॅमेरे ऋतिकवर फोकस झाले. पण याचवेळी बर्गर कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी या फोटोशूटचा फायदा घेतला. ऋतिकच्या मागेच चक्क बर्गरच्या कंपनीचा बॅनर लावण्यात आला. पण ऋतिकला याबाबत काहीच कल्पना नव्हती. आपल्या मागे कोण उभे आहे? कोण काय करत आहे? याचा त्यानं विचारही केला नाही. पण हा फोटो जर पाहिला तर प्रत्येकाला असंच वाटेल की ऋतिक हा एका कंपनीची जाहिरात करत आहे.
हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ऋतिकने पाहिल्यानंतर त्याला हे आवडलं नाही. त्यानं ट्विटरवर पोस्ट करत याचा चांगलाच समाचार घेतला. या पोस्टमध्ये कंपनीला उद्देशून त्याने लिहले की, हे जे तुम्ही केलं आहे ठीक नाही. त्याच्या या पोस्टवर कंपनीने त्याची माफी मागीतली आहे. यावर सोशल मीडियावर चांगल्याच कमेंट पडल्या आहेत. एका युजरने तर लिहिले आहे की, 'जाहिरातीचे असे संशोधन मी कधीच पाहिलेलं नव्हतं, खरच भारी कल्पना शोधून काढली'.
ऋतिक रोशन लवकरच साऊथच्या 'विक्रम वेधा' या नव्या फिल्ममध्ये दिसून येणार आहे. नुकतेच या फिल्मचे शुटींग पूर्ण झालेले आहे.
हेही वाचा