Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार २७ ऑक्टोबर २०२३

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

मेष : श्री गणेश सांगतात तुमच्यासाठी आजची ग्रहदशा उत्तम असेल. एखाद्या खास व्यक्तीकडून मिळालेल्या भावनिक आधारामुळे तुम्हाला आनंद होईल. तरुणांना त्यांच्या कष्टामुळे यश मिळेल. पण कौटुंबिक विषयांवरून भावंडात वाद होतील. अशा वादांत तणाव वाढणार नाही, याची काळजी घ्या. घरगुती कामात वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणची स्थिती जैसेथे राहील.

वृषभ : तुम्हाला इमेल किंवा फोनच्या माध्यमातून चांगली माहिती मिळेल जी तुमच्या उपयोगाची ठरेल. तुमची बुद्धिमत्ता आणि क्षमता या जोरावर आव्हान स्वीकाराल. महिलांनी त्यांच्या जबाबदारीचे भान ठेवावे. विचार करताना भावनेपेक्षा प्रत्यक्षस्थितीचा विचार करा. ओळखीच्या व्यक्तींशी थोडे अंतर ठेवून वागा. पती-पत्नीत आनंदाचे वातावरण राहील. पण निष्काळजीपणामुळे अडचणीत याल.

मिथुन :
श्री गणेश सांगतात आजचा दिवस संमिश्र राहील. इतरांवर अवलंबून राहाण्यापेक्षा स्वतःची कामं स्वतः करा. घरातील विवाहेच्छुकांची लग्न ठरेल. चुकीच्या कामात वेळ वाया जाणार नाही, याची काळजी घ्या. अनावश्यक गोष्टींत वेळ वाया घालवल्याने महत्त्वाची संधी हुकेल. कामाच्या ठिकाणी बदलांची शक्यता नाही. नवीन नोकरी स्वीकारताना दोन वेळा विचार करा.

कर्क : श्री गणेश सांगतात जर काही वाद सुरू असेल तर त्यातून संवादातून मार्ग निघेल. काही महत्त्वाची माहिती हाती लागेल. कौटुंबिक स्थितीचा नीट सांभाळ कराल. मित्राला आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मदत करावी लागेल. मदत हवी असेल तर अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याकडे दुलर्क्ष करू नका. .

सिंह : श्री गणेश सांगतात आजची ग्रहदशा तुमच्यासाठी उत्तम आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस घ्याल. शांतात आणि ऊर्जा यांचा अनुभव घ्याल. घरी बाळाच्या आगमनाची चाहुल लागेल. मनासारखे यश मिळाले नाही, म्हणून तरुणांनी तणाव घेऊ नये. एखाद्याच्या चुकीच्या सल्ल्यामुळे गोत्यात याल. नवरा-बायकोत भांडण होईल, पण ते कटू नसेल. एखादी दुःखद बातमी कानावर येईल.

कन्या : श्री गणेश सांगतात दैनंदिन कामात बदल केला तर तुम्हाला अधिक सकारात्मक वाटेल. दुसऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालू नका, यातून संबंध बिघडतील. इतरांकडून पैसे उधार घेऊ नका. आताची ग्रहस्थिती जास्त संकटं अंगावर घेण्यासारखी नाही. कामच्या ठिकाणी असणारे तुमचे वर्चस्व आणि प्रभाव टिकवून ठेवाल. घरी पती-पत्नीत ताळमेळ राहील. आरोग्य चांगले राहील.

तूळ : आर्थिक अडथळे आणि ताणतणाव निघून जाईल, त्यामुळे जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टी तयार होईल. भविष्यात फायद्याच्या ठरतील अशा व्यक्तींशी ओळख होईल. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. पण तुमच्याबद्दलच्या मत्सरातून काही व्यक्ती अफवा पसरवतील, त्यावर लक्ष ठेवा. व्यावसायिक गोष्टी गोपनीय ठेव. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. वाहन चालवताना काळजी घ्या.

वृश्चिक : श्री गणेश सांगतात की तुम्ही कुटुंबासमवेत भविष्याचे नियोजन करा. गेल्या काही कालावधीपासून अडकलेल्या कामांना दिशा मिळेल. घरातील ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. कौटुंबिक आणि वैयक्तिक खरेदी करताना बजेटकडे लक्ष द्या. लहान कारणांवरून शेजाऱ्यांशी भांडण होईल. व्यावसायिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्य यांच्यासमवेत वेळ घालवाल.

धनु :अनुभवी व्यक्तींच्या भेटी आणि धार्मिक कार्यातील सहभाग यामुळे सकारात्मक मानसिकता बनेल. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केलेल्या कामांमुळे यश दिसू लागेल. गुंतवणूक करताना सविस्तर माहिती घ्या. राग टाळा आणि संयम ठेवा. घरातील गोष्टींमुळे नवरा बायकोत वाद होतील. आरोग्य चांगेल राहील.

मकर :श्री गणेश सांगतात तुमच्या आजूबाजूला सकारात्मक गोष्टी घडत आहेत. तुम्ही योग्य निर्णय घ्याल, त्यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे धैर्य उंचावेल. काही व्यक्तींशी भेटी होतील, जे तुमच्या प्रगतीत मदत करतील. ताणतणाव असेल तर एकांतात राहा. जवळच्या व्यक्तीसंदर्भात काही नकारात्मक गोष्टी ऐकण्यात येतील, त्यामुळे नाराज व्हाल. पती-पत्नी संवादातून समस्या सोडवाल. आरोग्य चांगले राहील.

कुंभ : आजची ग्रहदशा चांगली आहे, त्याचा चांगला उपयोग करून घ्याल. कुटुंबातील विवाहेच्छुक तरुणांना चांगले स्थळ सांगून येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे. एखाद्याचा चुकीचा सल्ला महागात पडू शकतो. नवीन संबंध जुळवताना काळजी घ्या. व्यवसायासंबंधित निर्णय घेताना चुका होऊ शकतात. प्रदूषण आणि धुळीपासून काळजी घ्या.

मीन : तुम्ही आज वैयक्तिक आणि आवडीच्या गोष्टांना वेळ द्याल. त्यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल. आर्थिक विषयात काही चुका होऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या. मित्रांसोबत वाद होऊ शकतो, त्यामुळे तरुणांनी काळजी घ्यावी. व्यवसायात काही प्रमाणात यश मिळेल. कामात व्यग्र असतानाही, कुटुंबाला वेळ देऊ शकाल. आरोग्याची काळजी घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news