

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : एक जानेवारीपासून सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. या प्लेट नसणार्या वाहनांना 5 ते 10 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. (High Security Number Plate)
एक जानेवारीपासून सुरू होणार्या नवीन वर्षात जीएसटी, बँकिंगसह अनेक नियमांत बदल होत आहेत. त्यातला प्रमुख म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी न झाल्यास मोठा दंड आकारण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोडेड स्टीकर्स अनिवार्य करण्यात आले आहेत. याचे उल्लंघन करणार्यांना 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी दर निश्चित करण्यात आले असून दुचाकी वाहनांना 365 तर चारचाकी वाहनांना 600 ते 1100 रुपये खर्च येणार आहे. (High Security Number Plate)
अधिक वाचा :