High court : पत्नीला चारचौघात कानाखाली लगावने विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही : उच्च न्यायालय

High court : पत्नीला चारचौघात कानाखाली लगावने विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही : उच्च न्यायालय

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बायकोला चारचौघात कानखाली लगावने हा विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळ जम्मू काश्मीर आणि लड्डाख उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने नवऱ्याच्या विरोधातील विनयभंगाचा गुन्हा रद्द केला आहे. पण जाणीवपूर्वक इजा पोहोचवण्याचा गुन्हा ग्राह्य धरण्यात आला आहे. (High court)

High court: पत्नीला चारचौघात कानाखाली लगावने विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही

मेहबूब अली विरुद्ध निसार फातिमा या खटल्यात उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायमूर्ती रजनेश ओसवाल यांनी निकालात म्हटले आहे की या प्रकरणात कलम ३५४ नुसार गुन्हा नोंद होऊ शकणार नाही, पण कलम ३२३नुसार कारवाई होऊ शकते.
या प्रकरणात नवरा बायकोत कौटुंबिक न्यायालयात वाद सुरू आहे. एका सुनावणीनंतर नवऱ्याने बायकोला न्यायालयाच्या आवारात कानखाली लगावली होती. त्यानंतर नवऱ्यावर कलम ३२३ आणि कलम ३५४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. नवऱ्याने या प्रकरणात उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते.

हेही वाचा 

  • Chandigarh New mayor | सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला दणका; 'आप'चे कुलदीप कुमार चंदीगडचे महापौर
  • NCP vs NCP Crisis : निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात
  • पती-पत्नीच्या नात्यात सुधारणा होण्याची शक्यता नसेल तर सर्वोच्च न्यायालय घटस्फोटाला तत्‍काळ मंजुरी देवू शकते : घटनापीठ
  • अल्पवयीन पत्नीवर बलात्कार; पती निर्दोष : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
  • 'पतीची गर्लफ्रेंड नातेवाईक नाही' : मुंबई उच्च न्यायालयाने असे का म्हटलं?
  • Marital rape | पत्नीचे वय १८ वर्षांहून अधिक असल्यास वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही- हायकोर्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news