Heavy Rain In Gurugram : दिल्लीतील गुरुग्रामला पावसाने झोडपले, महामार्गाला नदीचे स्वरुप; वाहतुक कोंडीने लोक हैराण

Heavy Rain In Gurugram : दिल्लीतील गुरुग्रामला पावसाने झोडपले, महामार्गाला नदीचे स्वरुप; वाहतुक कोंडीने लोक हैराण
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : एकीकडे दिल्ली-एनसीआरमधील बदलत्या हवामानामुळे लोकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे, सायबर सिटी गुरुग्राममध्येही अवकाळी पावसाने लोकांची भांबेरी उडवली आहे. पावसामुळे दिल्ली जयपूर महामार्गावर पाणी साचले असून महामार्गाला नदीचे स्वरुप आले आहे. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या असून अनेक लोक रस्त्यातच अडकून पडले आहेत. (Heavy rain in gurugram)

सायबर सिटी म्हणून ओळख असलेल्या गुरुग्रामला अवकाळी पावसाने पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे. शहरातील गल्लोगल्ली पासून ते मुख्य रस्ते व महामार्गावर पाणी तुंबल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रस्त्यात तुंबलेल्या पाण्यामुळे वाहनांच्या वेगालाही ब्रेक लागला आहे. गुरुग्रामच्या दिल्ली जयपूर एक्सप्रेसवेवरही पाणी साचले असून महामार्गाला नदीचे स्वरुप आले आहे. दिल्ली जयपूर एक्स्प्रेस वेच्या नरसिंगपूरजवळील महामार्गावर पाणी तुंबले आहे, त्यामुळे एक्स्प्रेस वेवर सुमारे ५ किलोमीटर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. (Heavy rain in gurugram)

गुरुग्राममध्ये आज सकाळपासून एक्स्प्रेस वेवर झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण गुरुग्राम पावसामुळे जलमय झाले आहे. पावसामुळे अनेक भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पाणी साचल्याने वाहने थांबल्याने नागरिक वाहनातच अडकून पडल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एमएनसीची बहुतांश कार्यालये गुरुग्राममध्ये असल्याने लोकांना कार्यालयात जाण्यातही अडचणी येत होत्या.

पावसामुळे दिल्ली एक्स्प्रेस वेवर तुंबलेल्या पाण्यात अनेक वाहने अडकली आहेत. दरम्यान, प्रवाशांनी भरलेली बसही या पाण्यात अडकली होती. दोन तासांहून अधिकाळापासून बसमध्ये बसलेले प्रवासी बाहेर पडण्याची वाट पाहत होते. प्रत्यक्षात रस्त्यात इतके पाणी साचले होते की की बाहेर पडायलाही जागा नव्हती. सुदैवाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोन तासांनंतर बस बाहेर काढण्यात आली.

सध्या पावसामुळे गुरुग्रामच्या नरसिंगपूर चौकाची अवस्था दयनीय झाली आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात मान्सून अजून पोहोचलेला नाही, तरीही इथले रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत, मान्सून दाखल झाल्यानंतरच्या निर्माण होणाऱ्या स्थितीवर आधीच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news