‘तिच्या’ शरीरात हृदय उजवीकडे, यकृत डावीकडे!

‘तिच्या’ शरीरात हृदय उजवीकडे, यकृत डावीकडे!
Published on
Updated on

जयपूर : निसर्ग कधी कधी आपल्याच नियमांना काही अपवाद बनवत असतो. राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील तारानगर तालुक्यात वैद्यकीय शास्त्रातील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामान्य माणसाच्या शरीरात हृदय डावीकडे असते तर यकृत उजवीकडे असते; पण येथील एका महिलेचे हृदय तिच्या शरीराच्या उजव्या बाजूला आहे तर यकृत डावीकडे आहे!

जहाँतारानगर येथील शासकीय सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रामप्यारी या महिलेच्या छाती व पोटातील अवयवांची स्थिती सामान्य स्थितीच्या तुलनेत विरुद्ध ठिकाणी आढळून आली. वैद्यकीय भाषेत या प्रकाराला 'साइटस् इनव्हर्सस' म्हणतात. वैद्यकीय क्षेत्रातील हे दुर्मीळ प्रकरण डॉ. सज्जन कुमार यांच्याकडे आले आहे. त्यांनी सांगितले की, रामप्यारी नावाची महिला सतत पोटदुखीच्या तक्रारीसह तारानगर येथील शासकीय सामुदायिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आली होती. तिची सोनोग्राफी केली असता रामप्यारी 'साईटस् इनव्हर्सस डिसीज'ने ग्रस्त असल्याचे आढळून आले. लाखातील एका व्यक्तीसोबत असे घडते.

या आजारात रुग्णाच्या छातीत आणि पोटातील अवयव सामान्य स्थितीच्या तुलनेत विरुद्ध ठिकाणी आढळतात. म्हणजेच हृदय उजव्या बाजूला आढळतात तर यकृत डावीकडे असते. रामप्यारी यांनी सांगितले की, आजपर्यंत एकाही डॉक्टरला त्यांच्या आजाराविषयी माहिती मिळू शकली नाही आणि त्यांनाही माहिती नव्हते. डॉ. सज्जनकुमार रोहिवल यांनी सांगितले की, महिलेची सोनोग्राफी करत असताना तेही एकदा गोंधळले आणि नेमका काय प्रकार आहे, हे समजू शकले नाही. डॉक्टर सज्जन कुमार यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच असा प्रसंग पाहिला आहे. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news