सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

शिवसेना नाव व चिन्हाबाबत याचिकेवर आज सुनावणी

Published on

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था :  शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि. 18) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालात आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी याचिकाही ठाकरे गटाच्या वतीने दाखल केली होती. त्या याचिकेवरही सोमवारीच सुनावणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news