Rahul Dravid : राहुल द्रविडच्या फोन कॉलची भारतीय खेळाडूंना धास्ती!

Rahul Dravid : राहुल द्रविडच्या फोन कॉलची भारतीय खेळाडूंना धास्ती!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुल द्रविड (rahul dravid) टीम इंडियाचे हेड कोच कधी होतील याकडे अनेकांचे डोळे लागले होते. अखेर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काही नाट्यमय घडामोडींनंतर बीसीसीआयने द्रविड यांच्याकडे टीम इंडियाच्या हेड कोचची जबाबदारी सोपवली. हे महत्वाचे पद मिळण्याआधी त्यांनी टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यावेळी कोच म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

राहुल द्रविड ठरत आहेत खेळाडूंसाठी खलनायक!

राहुल द्रविड (rahul dravid) हेड कोच बनताच टीम इंडियात अनेक बदल झाले. संघाचा कर्णधार बदलला आणि युवा खेळाडूंना संधी मिळू लागली. यासोबतच द्रविड गुरुजींनी अनेक वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान न देता त्यांना घरात बसवले.

राहुल द्रविड (rahul dravid) यांच्या एका कॉलची भारतीय खेळाडू धास्ती!

ऋद्धिमान साहाला राहुल द्रविड यांनी कॉल करून त्याला संघातून ड्रॉप करण्याबाबत स्पष्ट केले होते. त्यानंतर अशाचप्रकारे द्रविड यांनी शिखर धवनला धक्का दिला. आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करूनही धवनला भारतीय संतून ड्रॉप करण्यात आले. आयपीएलनंतर द. आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणा-या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये डावखूरा फलंदाज धवनला संधी मिळणार नाही हे कोच यांनी त्याला फोन कॉल करून स्पष्टपणे कळवले. धवनला बाहेरचा सस्ता दाखवल्याने भारतीय क्रिकेट जगतात अनेकांनी भूवया उंचावल्या. माजी फलंदाज सुरेश रैनाने तर दिनेश कार्तिकला संधी मिळू शकते तर शिखर धवनला का नाही? अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

हेड कोच राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात नवा पायंडा पडत असल्याचे बोलले जात आहे. संघात स्थान देणार नाही असे थेट फोन कॉल करून संबंधित खेळाडूला स्वत: कोच द्रविड कळवत आहेत. त्यामुळे द्रविड यांचा फोन येणे म्हणजे आपल्या संघातून बाहेर बसावे लागणार अशी भीतीच खेळाडूंच्या मनात बसली आहे. या प्रकाराची जोरदार कुजबुज सुरू आहे.

द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news