Maharashtra Politics : हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ: कागलमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

Maharashtra Politics : हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ: कागलमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
Published on
Updated on

कागल; पुढारी वृत्तसेवा: आमदार हसन मुश्रीफ यांचा कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर कागल शहरातील चौका चौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत आज (दि.२) गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. ठीकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्ते जल्लोष करीत होते. (Maharashtra Politics)

शहरातील गैबी चौक, खर्डेकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सर्व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्यांचे वातावरण निर्माण झाले होते. तरुणांनी शहरातून मोटरसायकलची रॅली काढली. कार्यकर्ते गुलाल लावून एकमेकांना अलिंगन देत होते. ग्रामीण भागातील कार्यकर्ते देखील शहराकडे धाव घेत होते. गावागावांमध्ये देखील कार्यकर्ते जल्लोष करत असल्याचे (Maharashtra Politics) दिसून येत होते.

महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाने हादरले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली आहे. आज रविवारी (दि.2) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. अजित पवार यांच्यासह छगन भूजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे,  धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील अजित पवार यांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती. त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करावे आणि दुसरी जबाबदारी द्यावी, असे म्हटले होते. त्यांनी 1 जुलैपर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता. मात्र, यावर निर्णय न झाल्याने आज अजित पवार यांनी देवगिरी येथे बैठक बोलावली आणि राज्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा मोठा टर्निंग पॉइंट घेतला. आज रविवारी दुपारनंतर मोठ्या वेगाने घडामोडी घडत गेल्या.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news