HBD Amitabh : कधी उंची तर कधी आवाजामुळे नाकारले होते बिग बींना

amitabh bachchan
amitabh bachchan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कधी लांबलचक शरीर तर कधी वेगळा आवाज; या ना त्या कारणाने अमिताभ बच्चन यांना नाकारण्यात आले. आवाज ही अमिताभ यांची आणखी एक खासीयत. उंचपुरा बांधा आणि दमदार आवाज ही पुढे या सुपरस्टारची वैशिष्‍ट्‍ये बनली. (HBD Amitabh ) परंतु, सुरुवातीला यामुळेच त्‍यांची हेटाळणी झाली. पण, त्याच व्यक्तीने बॉलीवूडचा बादशाह बनून वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग बनला, जो अद्यापही बच्चनप्रेमी किंवा बच्चनवेडे म्हणून कार्यरत आहे. आज अमिताभ बच्चन यांचा ८१ वा वाढदिवस. त्यांच्या जीवनातील अगणित घटनांपैकी हे निवडक प्रसंग तुम्हाला वाचायला नक्कीच आवडतील. HBD Amitabh )

amitabh bachchan
amitabh bachchan

उंची अधिक असल्याने अडचण

७ नोव्हेंबर, १९६९ रोजी आजपासून ५० वर्षांपूर्वी एक हिंदी चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाचे नाव होते-'सात हिंदुस्तानी.' दिग्गज लेखक-दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांचा हा चित्रपट होता.

अमिताभ बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं, "मी मॅगजीन फिल्मफेअर-माधुरी स्पर्धेसाठी एक फोटो पाठवला होता. त्यावेळी चित्रपटात आपले स्थान मिळवणाऱ्या चेहऱ्यांसाठी फिल्मफेअर एक चांगले व्यासपीठ होतं. माझा फोटो रिजेक्ट करण्यात आला होता, काय ही आश्चर्याची गोष्ट आहे? परंतु, अमिताभ यांनी चित्रपटामध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला होता. ते कोलकातामध्ये आपली चांगली नोकरी सोडून मुंबईला आले होते.

त्यावेळी केए अब्बास गोव्याच्या स्वातंत्र्य संघर्षावर चित्रपट 'सात हिंदुस्तानी' बनवण्याची तयारी करत होते. त्यांना सात हिरो हवे होते, जे एकमेकांपेक्षा अगदी वेगळे असतील. यातील एका भूमिकेसाठी अब्बास यांनी टीनू आनंदला घेतले होते. टीनू आनंद अब्बास यांचे मित्र आणि प्रसिध्द लेखक इंदर राजचा मुलगा होता. टीनू आनंदची एक मैत्रीण होती नीना सिंह, जी मॉडेल होती. सात हिंदुस्तानीसाठी नीनाला चित्रपटात घेण्यात आले होते. अमिताभ बच्चन दूरदूरपर्यंत चित्रपटाचा भाग नव्हते.

नीना सिंहने अब्बास यांना अमिताभ बच्चन यांचं नाव सुचवलं होतं. या चित्रपटाची अभिनेत्री म्हणून नीना काम करणार होत्या. आणि टीनू आनंद अमिताभ यांच्यासाठी अब्बास यांच्याकडे गेले होते. आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही चित्रपट करू शकले नाहीत. अमिताभ मात्र या चित्रपटातून पुढे गेले. अनेकदा उंचीमुळे नाकारण्यात आलेल्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरचा पहिला चित्रपट सात हिंदुस्तानी साईन केला. ७ नोव्हेंबर, १९६९ रोजी ही चित्रपट रिलीज झाला. पण, पण, 'जंजीर' या चित्रपटाने त्‍यांना खरी ओळख मिळवून दिली.
दक्षिणेत 'दीवार,' 'नसीब,' 'अमर अकबर अँथनी,' 'जंजीर,' 'कस्‍मे वादे' या चित्रपटांचे रिमेक बनवण्‍यात आले. या प्रत्‍येक चित्रपटात रजनीकांत यांनी अमिताभ यांची भूमिका साकारलेली होती. अमिताभ यांच्‍या २० चित्रपटांत त्‍यांचे नाव विजय असे आहे. अमित हे सर्वाधिक वेळा वापरले गेलेले नाव आहे. डॉन,' 'दी ग्रेट गॅम्‍बलर,' 'आखरी रास्‍ता,' 'देशप्रेम,' 'अदालत,' 'सत्ते पे सत्ता,' 'कस्‍मे वादे' अशा चित्रपटांतूत त्‍यांनी दुहेरी भूमिका केल्‍या आहेत. महान चित्रपटांत तिहेरी भूमिका होती.

या गाण्यांना दिला आवाज

अमिताभ यांनी चित्रपटात गाणीही गायली आहेत. 'मि. नटवरलाल'मधील 'मेरे पास आवो मेरे दोस्‍तो,' 'लावारीस'मधील मेरे अंगने मे, 'सिलसिला'मधील 'निला आसमा सो गया' आणि 'रंग बरसे' ही काही उदाहरणे आहेत.

उतारवयात अमिताभ यांच्‍या 'बागबान,' 'बाबू,' 'आँखे,' 'पीकू,' 'पिंक,' 'वजीर', 'शमिताभ', 'पा', '१०२ नॉट आऊट' या चित्रपटातही वेगळ्‍या भूमिका केल्‍या. (Amitabh Bachchan )

१९८४ साली पद्‍मश्री, २००१ साली पद्‍मभूषण तर २०१५ साली पद्‍मविभूषणने त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आलं आहे. २००७ साली फ्रान्‍स सरकारने त्‍यांना नाईट ऑफ दी लेजिओन हा सन्‍मान बहाल केला. आतापर्यंत २२० वेगवेगळे पुरस्‍कार, ७ वेगवेगळ्‍या विद्‍यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्‍यांचा सन्‍मान केला आहे.

बिग बींना मिळाला होता पहिला राष्ट्रीय पुरस्कार

अग्निपथसाठी अमिताभ बच्चन यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ३८ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्नोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले होते. अमिताभ यांना आतापर्यंत चार राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाले असून, हा एक विक्रमच आहे. अग्‍निपथ (२०००), ब्‍लॅक (२००५), पा (२००९), पिकू (२०१५) या चित्रपटांसाठी त्‍यांना सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला आहे.
'ब्रह्मास्त्र,' 'झुंड,' 'चेहरे' , 'गुलाबो-सिताबो' या नव्या चित्रपटांमध्येही ते झळकले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news