

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा बारावीच्या परीक्षेत फिजिक्सच्या पेपर मध्ये हस्ताक्षर बदल आढळून आला आहे. त्यामुळे अंबाजोगाई केंद्रावरील 87 विद्यार्थ्यांना सुनावणीसाठी बोर्डात बोलावण्यात आले आहे. हा मास कॉपी चा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड हे जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यात सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती, या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांच्या पेपर मध्ये हस्ताक्षर बदल आढळून आला आहे, म्हणजे एका पेपर मध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे हस्ताक्षर दिसून आले. अशा विद्यार्थ्यांना बोर्डात सुनावणी साठी बोलावण्यात आले आहे.
हेही वाचा