Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराने व्यक्त केली निराशा; म्हणाला विश्वचषक खेळणार नसल्याने दु:खी

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराने व्यक्त केली निराशा; म्हणाला विश्वचषक खेळणार नसल्याने दु:खी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अखेर बीसीसीआयने (BCCI) सोमवारी (दि. ३) अधिकृतरित्या भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियामध्ये खेळवले जाणारे टी २० वर्ल्ड कप (ICC Men's T20 World Cup) खेळणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप खेळणार, नाही खेळणार या सर्व चर्चांना विराम मिळाला. यांनतर जसप्रीत बुमराहने ट्वीट करत आपण विश्वचषक खेळत नसल्याने निराश व दु:खी असल्याचे म्हटले आहे. पण, या दरम्यान आपण भारतीय संघांचे मनोबल वाढविण्याचे काम करु असे म्हटले आहे.

दरम्यान बुमराहने  (Jasprit Bumrah) मंगळवारी ट्वीट करत म्हटले की, मी दु:खी आहे की, मी वर्ल्ड कपच्या संघाचा भाग बनू शकलो नाही. पण, मला माझ्या प्रियजनांनी चाहत्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मला लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या, सर्वजणांनी मला पाठिबा दिला. यासाठी या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. यासह मी रिहॅब सेंटरमध्ये स्वत:ला लवकरात लवकर तंदुरुस्त करण्यासाठी परिश्रम घेईन, कठोर मेहनत करेन. तसेच मी भारतीय संघाचे मनोबल वाढविण्याचे त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करेन असे त्याने ट्वीट द्वारे म्हटले आहे.

टी २० विश्व चषक स्पर्धेतून जसप्रीत बुमराह बाहेर पडणे हे फक्त व्यक्तीगत त्याच्यासाठी नव्हे तर भारतीय संघ आणि तमाम भारतीय क्रिकेट रसिकांसाठी हा धक्काच बसला आहे. जसप्रीत बुमराहला आशिया चषकात सुद्धा मुकावे लागले होते. या मालिकेत भारताला साखळी सामन्यातच पराभवाचा सामना करावा लागला होता. जसप्रीत बुमराह भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. शिवाय त्याच्याकडे भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते. इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेल्या कसोटी सामन्यात त्याने नेतृत्व केले होते. (Jasprit Bumrah)

भारताच्या गोलंदाजी विषयी बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराह शिवाय भारताची गोलंदाजी कमकुवत ठरते. मागील आशिया चषक, ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा आणि त्यानंतर भारतात आलेल्या साऊथ आफ्रिके विरुद्ध खेळताना भारताची गोलंदाजी सुमार ठरली आहे. विशेषत: डेथ ओव्हरमध्ये भारतच्या गोलंदाजीवर विरोधी संघ धावांचा पाऊस पाडताना दिसत आहे. त्यामुळे बुमराहला पर्याय भारतीय संघासाठी मिळत नसल्याचे दिसत आहे. या दरम्यान भारतीय संघाने आवेश खान, भूवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चहर, हर्षल पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांना आजमावून पाहिले आहेत. पण, भारतीय संघ त्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. बुमराहच्या जागी ऑस्ट्रेलियामध्ये खेळविण्या येणाऱ्या टी २० संघात भारतीय संघात मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे. तसेच अनुभवी मोहम्मद शमी याला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचया कामगिरीवर सर्वांच्या नजरा स्थिरावल्या आहेत. (Jasprit Bumrah)


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news